Ketan Agrawal Murder Case | केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सिया-चेतनचा प्लॅन ‘या’ व्यक्तीला माहीत होतं

पुणे – केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज कोणते ना कोणते धक्कादायक खुलासे होत आहेत. आता तर या प्रकरणाने नवीन वळण घेतल्याचे पाहायला मिळत… सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोघे केतन अग्रवालची हत्या करणार असल्याचे एका व्यक्तीला माहीत होते… या तरुणाला पोलिसांनी आता ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, कारण या खुणात दोघांना कुणीतरी मदत करत असणार..असा पोलिसांना संशय होता..ते आता समोर आले आहे.. आज सिया आणि चेतनची पोलिस कोठडी संपणार असुन त्यांना आज वडगाव मावळ न्यायालयात दुपारी अडीचनंतर हजर केलं जाईल
कोण आहे ती व्यक्ती..
ज्या व्यक्तीला या खुणाचे माहीत होते तो दुसरा तिसरा कुणी नसुन केतनचा वर्गमित्र आहे.. हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या तो बालेवाडी येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतो.केतनच्या खूनाचे प्लॅनिंग चेतन आणि सिया या दोघांनी त्याच्यासोबत डिस्कस केले होते. त्या तरुणाला लोहगडावर चालण्याचा देखील आग्रह या दोघांनी केला होता. मात्र तो तरुण 18 जून रोजी लोहगडावर गेला नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केतन अग्रवाल याचा खून केल्यानंतर चेतन पहिल्यांदा याच त्याच्या मित्राला भेटला आहे. सिया देखील या तरुणासोबत बोलली असल्याची माहिती समोर येत आहे.. पोलिसांना मिळालेला हा पुरावा या हत्यांकाडाला काय वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन राहीले आहे.
Source link



