Uncategorized

Pune Update ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांना ‘प्रा. शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान’

त. भा. प्रतिनिधी पुणे
प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान’ या वषी ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत सुनीलकुमार लवटे यांना जाहीर झाला असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

तसेच दर्जेदार कार्यक्रमांच्या माध्यमातून गेली 48 वर्षे श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘गदिमा प्रतिष्ठान’चा यावषी विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जयंती दिनी 15 जुलै रोजी (बुधवार) सायंकाळी सहा वाजता एस. एम. जोशी सभागृहात होणाऱ्या समारंभात महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

या पुरस्काराचे हे तेरावे वर्ष असून, यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. रघुनाथ माशेलकर, सिंधुताई सपकाळ, प्रा. द. मा. मिरासदार, डॉ. ह. वि. सरदेसाई, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, नरेंद्र चपळगावकर, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. यशवंत पाटणे, डॉ. अऊणा ढेरे, चाऊदत्त आफळे, डॉ. शंकर अभ्यंकर यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​