Uncategorized

काँगोला 1-0 ने नमवून कोलंबिया बाद फेरीत

वृत्तसंस्था, ग्वाडालाहारा, मेक्सिको : डॅनियल मुनोजच्या गोलच्या जोरावर कोलंबियाने काँगोच्या भक्कम बचावाला भेदले आणि 1-0 असा विजय मिळवत विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश केला. सामन्याच्या सुऊवातीच्या 20 मिनिटांत काँगोचा गोलरक्षक लायनेल मपासी याने पाच कठीण बचाव करत कोलंबियाच्या आक्रमणाला रोखून धरले होते, मात्र 76 व्या मिनिटाला मुनोजने गोल केला.

एका बचावपटूला लागून दिशा बदललेला चेंडू जेव्हा ‘पेनल्टी एरिया’मध्ये मुनोजकडे आला तेव्हा त्याने डाव्या पायाने मारलेला फटका रोखणे मपासीला शक्य झाले नाही. या स्पर्धेतील मुनोजचा हा दुसरा गोल ठरला आणि ‘क्रिस्टल पॅलेस’च्या या फुलबॅक खेळाडूला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

सामन्याच्या अतिरिक्त वेळेत काँगोने बरोबरी साधण्याची संधी दोनदा निर्माण केली होती. परंतु कोलंबियाचा गोलरक्षक कामिलो वर्गास याने नॅथनेल मबुकूचा लांब अंतरावरून मारलेला फटका आणि त्यानंतर मिळालेल्या कॉर्नर किकवर चॅन्सेल मबेम्बाने मारलेला हेडर यावर उत्कृष्ट बचाव करत संघाला विजय मिळवून दिला.

कोलंबियाचा स्टार आघाडीपटू लुईस दियाझचे दुसऱ्या सत्राच्या उत्तरार्धात एकापाठोपाठ दोन गोल रद्द करण्यात आले. एक 79 व्या मिनिटाला फाऊलमुळे आणि दुसरा 80 व्या मिनिटाला ऑफसाईडमुळे रद्द करण्यात आला. ‘के’ गटात कोलंबियाचे दोन सामन्यांतून सहा गुण झाले असून ते पोर्तुगालपेक्षा दोन आणि काँगोपेक्षा पाच गुणांनी पुढे आहेत. गटात अव्वल स्थान मिळविण्यासाठी कोलंबियाला आता पोर्तुगालविऊद्धचा सामना किमान सामना बरोबरीत सोडविणे आवश्यक आहे. तो निकाल पोर्तुगाललाही बाद फेरीत पोहोचविण्यासाठी पुरेसा ठरेल.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​