Uncategorized

Rahul Narwekar | आशाताई भोसले यांच्याबाबत झालेल्या ‘त्या’ चुकीवर राहुल नार्वेकरांची अखेर दिलगिरी

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वर्गीय आशाताई भोसले यांच्याबाबत शोकप्रस्तावाचे वाचन करताना झालेल्या चुकीमुळे निर्माण झालेल्या वादावर अखेर सभागृहात दिलगिरी व्यक्त केली आहे. या प्रकरणावरून राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर नाराजी व्यक्त करत, सभागृहातील सदस्यांनी त्यावेळी हस्तक्षेप का केला नाही, असा सवाल उपस्थित केला होता.

आज सभागृहात बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, शोकप्रस्तावाचे वाचन करताना काही तांत्रिक अडचणींमुळे आणि मुद्रित प्रतीतील त्रुटींमुळे ही चूक घडली. गेली अनेक वर्षे आपण मराठी भाषेतूनच सभागृहाचे कामकाज चालवत असल्याचे सांगत त्यांनी मराठी भाषेबद्दलचा आपला अभिमानही व्यक्त केला.

आशाताई भोसले यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा अवमान करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट करत, या घटनेमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून दिलगिरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणाची जबाबदारी केवळ अध्यक्षांवर टाकू नये, तर भाषणाची प्रत तयार करणाऱ्या संबंधितांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी काही सदस्यांनी सभागृहात केली. मराठी भाषेचा स्वाभिमान आणि आशाताई भोसले यांच्याविषयी असलेला आदर यामुळे हा विषय राज्यभर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असून, या प्रकरणावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​