सांगली-सातारा विधान परिषदेत भाजपची दणदणीत बाजी;

सांगली ; सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पहिल्याच पसंतीच्या मतांमध्ये विजयाचा कोटा ओलांडत त्यांनी महाविकास आघाडी समर्थित राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा पराभव केला.
सांगलीतील तरुण भारत स्टेडियम येथे झालेल्या मतमोजणीत एकूण ८८५ मते वैध ठरली, तर ९ मते अवैध ठरली. धैर्यशील कदम यांना पहिल्या पसंतीची तब्बल ५९३ मते मिळाली, तर अभयसिंह जगताप यांना २९२ मते मिळाली. त्यामुळे धैर्यशील कदम यांनी विजयासाठी आवश्यक कोट्यापेक्षा ३०१ मते अधिक मिळवत एकतर्फी विजय संपादन केला.
मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून धैर्यशील कदम यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके फोडले, गुलाल उधळला आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
Source link



