Uncategorized

नेदरलँड्सकडून स्वीनडचा 5-1 ने धुव्वा

डच संघाने गटात मिळविले अव्वल स्थान, ब्रायन ब्रॉबी, कोडी गॅकपो यांचे प्रत्येकी दोन गोल

वृत्तसंस्था, ह्युस्टन : पहिल्या सामन्यातील बरोबरीनंतर प्रचंड दबावाखाली असलेल्या नेदरलँड्सने विश्वचषकात स्वीडनविऊद्ध दमदार कामगिरी करत ‘गट एफ’मध्ये अव्वल स्थान गाठले. ब्रायन ब्रॉबी आणि कोडी गॅकपो यांनी प्रत्येकी दोन गोल करत नेदरलँड्सला 5-1 असा विजय मिळवून दिला.

ब्रॉबीने पहिल्या सत्रामध्ये गोल केले, ज्यामुळे नेदरलँड्सला चांगली सुऊवात मिळाली. जपानविऊद्धचा सामना 2-2 असा बरोबरीत सुटल्यानंतर त्यांनी हा मोठा विजय साकारला. या विजयामुळे नेदरलँड्सच्या खात्यात गटात सर्वाधिक चार गुण जमा झाले आहेत. स्वीडनकडे तीन गुण आहेत. गॅकपो, ज्याने एका गोलसाठी मदतही केली, त्याने मध्यांतरानंतर लगेचच आघाडी 3-0 अशी वाढवली. त्याने 47 व्या मिनिटाला डेन्झेल डमफ्रिसच्या क्रॉसवर गोल केला. पुन्हा 54 व्या मिनिटाला गोल करत त्याने ब्रॉबीच्या कामगिरीशी बरोबरी केली.

स्वीडनचा बचाव भेदण्यासाठी डच संघाने वापरलेली रणनीती आणि ब्रॉबीकडे क्रॉस पाठवण्याची चाल सुऊवातीलाच यशस्वी ठरली. पाचव्या मिनिटाला गॅकपोने ‘बॉक्स’च्या मध्यभागी ’क्रॉस’ पाठवला आणि ब्रॉबीने उजव्या पायाने चेंडूला फटकावले. त्याच वेळी तो मैदानावर कोसळला. त्याचा दुसरा गोल तेव्हा झाला जेव्हा डमफ्रिजने दिलेल्या क्रॉसवर त्याने घसरत जाऊन उजव्या पायाने चेंडूला स्पर्श केला आणि 17 व्या मिनिटाला चेंडू जाळीत सारला. 59 व्या मिनिटाला स्वीडनच्या अँथनी इलांगाने डाव्या पायाने गोल करून ही आघाडी 4-1 अशी कमी केली आणि स्वीडनला एकही गोल न करता सामना हरण्याची नामुष्की टाळण्यास मदत केली.

त्याआधी स्वीडनला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या होत्या, परंतु नेदरलँड्सचा गोलरक्षक बार्ट वरब्रगेन याने पहिल्या सत्रात चार उत्कृष्ट बचाव करत चमकदार कामगिरी केली. 44 व्या मिनिटाला स्वीडनच्या गुस्ताफ लेगरबिल्के याने हेडरद्वारे गोल करून आघाडी 2-1 अशी कमी केल्याचे वाटले होते, परंतु त्याला ‘ऑफसाइड’ ठरवण्यात आले. गॅकपोच्या दुसऱ्या गोलसाठी मदत करणाऱ्या क्रायसेन्सियो समरविले याने 89 व्या मिनिटाला नेदरलँड्ससाठी आणखी एक गोल केला. सामन्याच्या उत्तरार्धात समरविलेच्या डोक्यावर लाथ बसल्याने त्याला टाके पडले. परंतु तो पुढच्या सामन्यासाठी सज्ज असेल, असे नेदरलँड्सचे प्रशिक्षक कोमन यांनी सांगितले.

स्वीडनचा विश्वचषकातील दुसरा सर्वांत मोठा पराभव

पहिल्या सामन्यात ट्युनिशियाचा 5-1 असा धुव्वा उडवणाऱ्या स्वीडनला आपली ती दमदार कामगिरी या सामन्यात कायम राखता आली नाही. डच संघाकडून झालेला हा पराभव 1950 मध्ये ब्राझीलकडून 1-7 असा पराभव पत्करल्यानंतरचा त्यांचा विश्वचषकातील सर्वांत मोठा पराभव ठरला. स्वीडनचे प्रशिक्षक ग्रॅहम पॉटर म्हणाले की, हा पराभव त्यांच्या संघाच्या कामगिरीपेक्षा नेदरलँड्सकडून झालेल्या उत्कृष्ट खेळाचा परिणाम होता. त्यानंतर त्यांनी डच संघातील अनेक बड्या खेळाडूंची नावे घेतली.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​