Uncategorized
रेखा भोसले यांचे निधन – Tarun Bharat

दोडामार्ग –
दोडामार्ग बाजारपेठेतील महाराजा सभागृहाचे मालक कै. एकनाथ भोसले यांच्या पत्नी रेखा भोसले (वय 73 ) यांचे नुकतेच निधन झाले.काही महिन्यापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले होते. दोडामार्ग बाजारपेठेत उद्योग, व्यवसायातुन आपली विशेष ओळख भोसले कुटुंबियानी निर्माण केली असल्याने त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यांच्या पश्चात विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
Source link



