Uncategorized

he entire world will practice yoga today!

पंतप्रधान मोदींसोबत योग करण्यासाठी 6 लाखांहून अधिक संस्थांनी नोंदणी

वृत्तसंस्था/ कोलकाता, नवी दिल्ली

बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 च्या पार्श्वभूमीवर, देशभरात योगासाठी अभूतपूर्व उत्साह दिसून येत आहे. आयुष मंत्रालयाच्या योग संगम पोर्टलवर नोंदणी केलेल्या संस्थांची संख्या 6 लाखांच्या पुढे गेली आहे. हे यश योग आता केवळ एक आरोग्य सराव राहिलेला नाही, तर लोकांच्या सहभागासह एक व्यापक राष्ट्रीय चळवळ बनल्याचे दर्शन घडवते. जागतिक पातळीवर तब्बल 190 हून अधिक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत असल्याने योग ही एक जागतिक चळवळ बनली आहे.

यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, पश्चिम बंगाल राज्य भारतासह जगाला आरोग्य आणि संस्कृतीचे एक अनोखे आणि भव्य प्रदर्शन दाखवण्यासाठी सज्ज झाले आहे. 21 जून रोजी होणाऱ्या या भव्य महोत्सवात, हुगळी नदीवरील 500 हून अधिक बोटींवर हजारो लोक एकत्र योगाभ्यास करतील. तसेच कोलकाताच्या ऐतिहासिक रेड रोडवर एक मोठा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आयोजित केला जाईल. या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: हजारो नागरिकांसोबत योगाभ्यास करून देशाला आरोग्याचा संदेश देतील.

आंतरराष्ट्रीय योग दिन 2015 मध्ये सुरू करण्यात आला. गेल्या 11 वर्षांत संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या एका वार्षिक कार्यक्रमापासून ते जगातील सर्वात मोठ्या सहभागी आरोग्य चळवळींपैकी एक म्हणून त्याची प्रगती झाली आहे. योगाच्या माध्यमातून विविध देशांतील, संस्कृतींतील आणि समुदायांतील लाखो लोक एका समान व्यासपीठावर एकत्र येत आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 ची संकल्पना ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ अशी असून ती प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, सक्रिय जीवनशैली आणि दीर्घकालीन आरोग्याला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करते.

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय योग कार्यक्रमात देशभरातील लाखो लोक एकत्र योगाभ्यास करतील. योग संगम उपक्रमांतर्गत नोंदणीकृत संस्था, सामान्य योग नियमांचे पालन करून, आपापल्या ठिकाणी सामूहिक योग सत्रांचे आयोजन करतील आणि या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी होतील. आयुष मंत्रालयाच्या मते, अलिकडच्या काळात पोर्टलवरील नोंदणी वाढली आहे. शाळा, महाविद्यालये, सरकारी संस्था, खासगी संस्था, गैर-सरकारी संस्था आणि सामुदायिक गट मोठ्या संख्येने या मोहिमेत सामील होत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात योग पोहोचवणे आणि त्याला एक सामायिक राष्ट्रीय आरोग्य चळवळ म्हणून स्थापित करणे, हे योग संगमचे उद्दिष्ट आहे.

डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाखोंचा सहभाग

योग संगम पोर्टल या मोहिमेचा डिजिटल कणा म्हणून उदयास आले आहे. याच्या माध्यमातून संस्था त्यांच्या कार्यक्रमांची नोंदणी करत आहेत. स्थळाची माहिती शेअर करत आहेत आणि सहभागींना जोडत आहेत. हा प्लॅटफॉर्म देशव्यापी समन्वय आणि व्यापक सहभाग सुनिश्चित करतो. हा उपक्रम देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोहोचला असून, त्यात 778 जिह्यांचा समावेश आहे. आकडेवारीनुसार, 3.22 लाखांहून अधिक सरकारी संस्था, जवळपास 2 लाख शैक्षणिक संस्था, 16 हजारांहून अधिक खासगी संस्था, 5 हजारांहून अधिक गैर-सरकारी संस्था आणि 44 हजार इतर संस्थांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे.

पश्चिम बंगाल आणि राजस्थान आघाडीवर

2.76 लाखांहून अधिक संस्थांच्या नोंदणीसह पश्चिम बंगाल आघाडीवर आहे. राजस्थानमध्ये जवळपास दीड लाख नोंदणी झाली आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा आणि छत्तीसगड यांसारख्या राज्यांमध्येही लक्षणीय सहभाग दिसून येत आहे.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​