Uncategorized

पाकिस्तानात बॉम्बस्फोटांनी खळबळ, 7 ठार

रिमोट-कंट्रोलद्वारे वाहनांना केले लक्ष्य

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तानात खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बन्नू जिह्यात शनिवारी झालेल्या दोन सलग स्फोटांनी देशातील वाढत्या दहशतवादाचे भीषण चित्र पुन्हा एकदा समोर आणले आहे. दहशतवाद्यांनी प्रथम एका प्रवासी वाहनाला लक्ष्य केल्यानंतर, जखमींना रुग्णालयात नेत असताना दुसरा स्फोट घडवून आणण्यात आला. दोन्ही हल्ल्यांमध्ये किमान 7 जण ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले. पोलिसांनी हे स्फोट रिमोट-कंट्रोलद्वारे घडवण्यात आलेले दहशतवादी हल्ले असे म्हटले आहे. या घटनेनंतर, सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सील केला असून शोधमोहीम सुरू केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पहिला स्फोट बन्नू जिह्यातील फांग मुसा खेल परिसरात झाला. प्रवाशांना घेऊन जाणारे एक खासगी डॅटसन वाहन डोमेलच्या दिशेने जात असताना त्यावर रिमोट-कंट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याने वाहनाचे पूर्णपणे नुकसान केले. यात 5  जणांचा जागीच मृत्यू झाला. इतर अनेक जण जखमीही झाले. स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला.

पहिल्या हल्ल्यातील जखमींना रुग्णालयात नेले जात असतानाच, सुमारे एक किलोमीटर अंतरावर दुसरा स्फोट झाला. या हल्ल्यातही वाहनाला लक्ष्य करण्यात आले होते. दुसऱ्या स्फोटात दोन जणांचा मृत्यू होण्यासोबतच वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. या दोन लागोपाठच्या स्फोटांमुळे परिसरात घबराट पसरली. हल्लेखोरांनी बचाव कार्यालाही लक्ष्य करण्याची योजना आखली होती, असा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​