Uncategorized

विहिरीत पडलेल्या गव्याच्या पिल्लाची त्याच्या आईसमोरच सुटका

वनविभागाच्या प्रसंगावधानाचे कौतुक

ओटवणे : प्रतिनिधी

माजगाव हरसावंतवाडा परिसरात विहिरीत पडलेल्या गव्याच्या लहान पिल्लाला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वर काढून सुखरूप सुटका केली. गव्याच्या लहान पिल्लाला कोणतीही दुखापत झाली नसल्याची खात्री करून या पिल्लाला परिसरातच वाट पाहत असलेल्या त्याच्या आईच्या मादी गव्याकडे सोडण्यात आले. वनविभागाच्या या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.बुधवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास माजगाव येथील न्हानू गाड यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये गव्यांचा कळप चरत असल्याचा त्यांच्या दृष्टीस पडला. त्यानंतर काही वेळाने या कंपाऊंडमधील कठडा नसलेल्या विहिरीतून आवाज आल्याने त्यांनी या विहिरीकडे पाहिले असता गव्याचे पिल्लू विहिरीत पडल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी तात्काळ याची माहिती माजगावचे वनपाल प्रमोद राणे यांना दिली.वनपाल प्रमोद राणे यांनी सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार तात्काळ सावंतवाडीच्या ‘आर. आर. टीम’ला (रॅपिड रेस्क्यू टीम) घटनास्थळी पाचारण करण्यात आले. वनविभागाचे पथक रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. सुमारे २५ ते ३० फूट खोल विहिरीत ८ ते ९ महिन्यांचे गव्याचे पिल्लू पडले होते. या विहिरीतील पिल्लाच्या आवाजामुळे त्याची आई मादी गवा या विहिरी नजीकच तळ ठोकून होती.यावेळी वनविभागाच्या रेस्क्यू टीमने रात्रीची वेळ असल्यामुळे सावधगिरीने विहिरीत उतरून पिल्लाची पाहणी केली. सुदैवानेच इतक्या उंचीवरून पडूनही या पिल्लाला कोणतीही दुखापत झाली नव्हती. त्यानंतर आवश्यक त्या साधनाद्वारे पिल्लाला विहिरीबाहेर सुखरूप काढण्यात आले. विहिरीबाहेर आणल्यानंतर या पिल्लाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात ते तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर या पिल्लाची आई गवा मादी आपल्या
पिल्लाची वाट पाहत उभी होती. वनविभागाने सर्वांच्या संमतीने या पिलाला मुक्त केले. त्यानंतर हे पिल्लू धावत जाऊन आपल्या आईला जाऊन बिलगले आणि कळपात सामील झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वर काढून सुखरूप सुटका केली. गव्याच्या लहान पिल्लाला कोणतीही दुखापत झाली नसल्याची खात्री करून या पिल्लाला परिसरातच वाट पाहत असलेल्या त्याच्या आईच्या मादी गव्याकडे सोडण्यात आले. वनविभागाच्या या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.
बुधवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास माजगाव येथील न्हानू गाड यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये गव्यांचा कळप चरत असल्याचा त्यांच्या दृष्टीस पडला. त्यानंतर काही वेळाने या कंपाऊंडमधील कठडा नसलेल्या विहिरीतून आवाज आल्याने त्यांनी या विहिरीइकडे पाहिले असता गव्याचे पिल्लू विहिरीत पडल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी तात्काळ याची माहिती माजगावचे वनपाल प्रमोद राणे यांना दिली.
वनपाल प्रमोद राणे यांनी सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार तात्काळ सावंतवाडीच्या ‘आर. आर. टीम’ला (रॅपिड रेस्क्यू टीम) घटनास्थळी पाचारण करण्यात आले. वनविभागाचे पथक रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. सुमारे २५ ते ३० फूट खोल विहिरीत ८ ते ९ महिन्यांचे गव्याचे पिल्लू पडले होते. या विहिरीतील पिल्लाच्या आवाजामुळे त्याची आई मादी गवा या विहिरी नजीकच तळ ठोकून होती.यावेळी वनविभागाच्या रेस्क्यू टीमने रात्रीची वेळ असल्यामुळे सावधगिरीने विहिरीत उतरून पिल्लाची पाहणी केली. सुदैवानेच इतक्या उंचीवरून पडूनही या पिलाला कोणतीही दुखापत नव्हती. त्यानंतर आवश्यक त्या साधनाद्वारे पिल्लाला विहिरीबाहेर सुखरूप काढण्यात आले. विहिरीबाहेर आणल्यानंतर या पिल्लाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात ते तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या पिल्लाची आई गवा मादी आपल्या पिल्लाची वाट पाहत उभी होती. वनविभागाने सर्वांच्या संमतीने या पिलाला मुक्त केले. त्यानंतर हे पिल्लू धावत जाऊन आपल्या आईला जाऊन बिलगले आणि कळपात सामील झाले. वनविभागाच्या या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​