Uncategorized

भारत पुढील 2-3 दशकांत 30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था?

‘इन्व्हेस्टिंग फॉर अ न्यू एरा’मध्ये उद्योगपती मुकेश अंबानींचे प्रतिपादन

वृत्तसंस्था, मुंबई

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक यांनी मुंबईत आयोजित ‘इन्व्हेस्टिंग फॉर अ न्यू एरा’ या कार्यक्रमात भारताच्या भविष्याचा आराखडा सादर केला. अंबानींनी असा विश्वास व्यक्त केला की, भारत पुढील दोन ते तीन दशकांत 30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे.

अंबानी म्हणाले की, भारत पारंपरिकरित्या एक बचत करणारा देश राहिला आहे, पण आता गुंतवणुकीची वेळ आली आहे. जर भारतीयांची बचत भांडवली बाजारात आली, तर त्यामुळे केवळ कुटुंबांची संपत्तीच वाढणार नाही, तर देशाच्या जीडीपीलाही चालना मिळेल.

लॅरी फिंक यांनीही सहमती दर्शवली की, दीर्घकालीन इक्विटी गुंतवणूक हे संपत्ती निर्मितीचे सर्वात प्रभावी साधन आहे. मुकेश अंबानी म्हणाले की, मजबूत धोरण, राजकीय स्थिरता आणि डिजिटल क्रांतीने भारताला गुंतवणुकीसाठी जगातील सर्वात आकर्षक केंद्र बनवले आहे.

अंबानी म्हणाले की, आजचा भारत म्हणजे फळांनी लगडलेले एक झाड आहे, जे देशाच्या दीर्घकालीन विकासावर अवलंबून राहतील त्यांना येत्या दशकांमध्ये अधिक लाभ मिळेल.

लॅरी फिंक म्हणाले की, एआयमध्ये गुंतवणूक न करणे हा एक मोठा धोका आहे. जर आपण एआयमध्ये गुंतवणूक केली नाही, तर ही शर्यत चीन जिंकेल. भारताकडे डेटाचा प्रचंड साठा आहे, जो एआयला चालना देईल. भारत आता उपभोगाच्या माध्यमातून एक नवोन्मेष केंद्र बनत आहे.

लॅरी फिंक यांनी भारताला जागतिक अर्थव्यवस्थेसाठी ‘आशेचा किरण’ म्हटले आहे. ते म्हणाले की, ज्या प्रकारे भारताने आपल्या तरुण पिढीला यूपीआय, आधार यांसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडले आहे, त्यामुळे भारताला एक नवी ओळख मिळाली आहे. अंबानी म्हणाले की, भारत आता केवळ एक उपभोग बाजारपेठ राहिलेला नाही, तर तो एक ‘नवोन्मेष केंद्र’ बनला आहे.

तरुण रिलायन्ससारख्या 100 नवीन कंपन्या तयार करू शकतात

मुकेश अंबानींनी भारतीय स्टार्टअप्स व तरुणांवर विश्वास व्यक्त केला आणि सांगितले की, नजीकच्या भविष्यात देशात रिलायन्सच्या पातळीच्या किमान 100 नवीन कंपन्या स्थापन होतील. त्यांनी तरुणांना ‘विकासावर’ विश्वास ठेवण्याचा आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला.

भारत दशकातच ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण

अंबानींनी दावा केला की, भारत पुढील दशकात आपल्या उर्जेच्या गरजांपैकी 80 टक्के गरजा देशांतर्गत स्रोतांमधून पूर्ण करू शकेल. लॅरी फिंक यांनी रिलायन्सच्या ‘नेट-झिरो’ लक्ष्याचे कौतुक केले आणि म्हणाले की, भारत भविष्यात हरित उर्जेचा एक प्रमुख निर्यातदार बनू शकतो.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​