Uncategorized

श्रीलंकेकडून विद्यमान विजेत्या न्यूझीलंडला धक्का

महिला टी-20 विश्वचषक : सामनावीर निलाक्षिका सिल्वाचे नाबाद अर्धशतक, नुत्यांगनाचेही मोलाचे योगदान

वृत्तसंस्था, साऊदम्पटन

निलाक्षिका सिल्वाचे नाबाद अर्धशतक व तिने कौशिनी नुत्यांगनासमवेत केलेल्या अभेद्य 48 धावांच्या भागीदारीच्या जोरावर येथे झालेल्या सामन्यात श्रीलंकेने विद्यमान विजेत्या न्यूझीलंडचा 2 चेंडू बाकी ठेवून 5 गड्यांनी पराभव केला. 2026 च्या आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील लंकेचा हा पहिला विजय आहे. यापूर्वी त्यांना सलामीच्या सामन्यात इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता.

या स्पर्धेतील गट दोनमधील हा सातवा सामना होता. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 20 षटकांत 6 बाद 150 धावा जमवित लंकेला विजयासाठी 151 धावांचे आव्हान दिले. लंकेने 19.4 षटकांत 5 बाद 153 धावा जमवित विजय नोंदविला.

न्यूझीलंडच्या डावात कर्णधार मेली केर आणि सोफी डिव्हाईन यांनी दमदार फलंदाजी करत तिसऱ्या गड्यासाठी 43 धावांची भागिदारी केली. सलामीची गेझ पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर झेलबाद झाली. मिथाली अयोध्याने न्यूझीलंडचा हा सलामीचा फलंदाज बाद केला. प्लिमेर आणि मेली केर यांनी दुसऱ्या गड्यासाठी 49 धावांची भागिदारी केली. मिपागेने प्लिमेरला झेलबाद केले. तिने 22 चेंडूत 2 चौकारांसह 18 धावा केल्या. कविशा दिलहारीने कर्णधार केरला कविंदीकरवी झेलबाद केले. तिने 36 चेंडूत 5 चौकारांसह 45 धावा झळकविल्या. दिलहारीने न्यूझीलंडला आणखी एक धक्का देताना हॅलिडेला झेलबाद केले. तिने 7 धावा जमविल्या. सुगंधिका कुमारीने डिव्हाईनला सिल्वाकरवी झेलबाद केले. तिने 30 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 45 धावा जमविल्या. मॅडी ग्रीनने 13 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 18 धावा केल्या. अटापटूच्या गोलंदाजीवर शार्प खाते उघडण्यापूर्वी झेलबाद झाली. जेस केर 6 धावांवर नाबाद राहिली. लंकेतर्फे कविशा दिलहारीने 35 धावांत 2 तर अयोध्या, सुगंधिका कुमारी, अटापटू आणि मिपागे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझ्^ााrलंडच्या डावामध्ये 1 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 38 धावा जमविताना 1 गडी गमविला. न्यूझीलंडने 14 षटकाअखेर 3 बाद 101 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडचे दीड शतक 120 चेंडूत नोंदविले गेले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावाला कर्णधार अटापटू आणि विश्मी गुणरत्ने यांनी सावध सुरुवात करून देताना 35 चेंडूत 45 धावांची भागिदारी केली. इलिंगने अटापटूचा त्रिफळा उडविला. तिने 19 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 27 धावा जमविल्या. नेन्सी पटेलने गुणरत्नेला झेलबाद केले. तिने 19 चेंडूत 3 चौकारांसह 17 धावा जमविल्या. हसिनी परेरा 8 व्या षटकांत एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचीत झाली. तिने केवळ 2 धावा केल्या. नेन्सी पटेलने समरविक्रमाचा 5 धावांवर त्रिफळा उडविला. लंकेची स्थिती यावेळी 8.3 षटकांत 4 बाद 55 अशी होती.

कविशा दिलहारी आणि निलाक्षिका सिल्वा यांनी पाचव्या गड्यासाठी 50 धावांची भागिदारी केली. दिलहारी आणि सिल्वा यांच्यात एकेरी धाव घेत असताना योग्य ताळमेळ नसल्याने दिलहारी जेस केरच्या चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर धावचीत झाली. तिने 16 चेंडूत 2 चौकारांसह 17 धावा जमविल्या. 15 षटकाअखेर लंकेने 5 बाद 105 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यांना विजयासाठी 30 चेंडूत 46 धावांची गरज होती.

निलाक्षिका सिल्वा आणि कौशिनी यांनी लंकेला 2 चेंडू बाकी ठेवून थरारक विजय मिळवून दिला. निलाक्षिकाने विजयी चौकार ठोकून आपले अर्धशतक पूर्ण केले. सिल्वाने 37 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 54 तर कौशिनीने 14 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 24 धावा जमविल्या. या जोडीने सहाव्या गड्यासाठी अभेद्य 48 धावांची भागिदारी केली. लंकेच्या डावात 2 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. लंकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 45


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​