Uncategorized

सोनवडे गावात भरवस्तीत बिबट्याचा मुक्त संचार; पाळीव कुत्र्यावरील हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद!

वारणावती -सोनवडे ता. शिराळायेथे भरवस्तीत रात्रीच्या वेळी बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून बुधवारी मध्यरात्री दीपक शामराव बाबर यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली आहे. बिबट्याचा हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोनवडे वेचील दीपक बाबर यांचे घराजवळ गेल्या अनेक महिन्यांपासून रात्रीच्यावेळी बिबट्या निदर्शनात येत असून आजवर दीपक बाबर यांचे दहाहून अधिक पाळीव कुत्र्यांबर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहेत.
वारंवार घटना घडत आहे.

त्यामुळे कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी व पाळीव प्राण्यांवर लक्ष रहावे यासाठी दीपक बाबर यांनी घराबाहेर सीसीटीव्ही बसवला आहे. या सीसीटीव्हीमध्ये घराजवळ वारंवार बिबट्याचा चावर असल्याचे निदर्शनास येत आहे. हल्ला करून दीपक बाबर यांनी काही दिवसापूर्वी आणलेले पाळीव कुत्रे ठार केले. त्यामुळे कुटुंबियांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्यावेळी येथील नागरिकांना बिबट्याचे भितीने जीव मुठीत घेऊन रहावे लागत असून संबंधित वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्यातून जोर धरत आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​