Uncategorized

Bosnia faces a challenge against co-host Canada.

कॅनडाच्या विश्वचषक स्वप्नांची पहिली कसोटी, जखमी खेळाडूंची समस्या, अनुभवी झेकोवर बोस्नियाचे यश अवलंबून

टोरांटो/वृत्तसंस्था

कॅनडाचा संघ आपल्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यासाठी प्रचंड दबावाखाली मैदानात उतरणार आहे. देशाच्या फुटबॉल इतिहासातील कदाचित सर्वात महत्त्वपूर्ण क्षणी, शुक्रवारी ते बोस्निया आणि हर्जेगोव्हिनाचा सामना करतील. आपल्याच देशातील प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा असताना होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघांचे लक्ष्य नॉकआऊट फेरीत पहिल्यांदाच स्थान मिळविणे हे असेल.

जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवण्याचा कॅनडाचा प्रवास अत्यंत वेदनादायी राहिला आहे. 1986 ते 2022 च्या स्पर्धांमधील सहा सामन्यांत मिळालेले सहा पराभव आपल्या विश्वचषकातील ओळखीच्या शोधात असलेल्या एका देशाची व्यथा मांडतात. परंतु प्रशिक्षक जेसी मार्श यांच्या क्रांतिकारी बदलांनी संघाला नवा आत्मविश्वास दिला आहे. मे 2024 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने कोपा अमेरिका स्पर्धेत पदार्पण करत उपांत्य फेरी गाठली होती. (जिथे त्यांना विद्यमान विश्वविजेत्या अर्जेंटिनाने पराभूत केले). मात्र विश्वचषकातील यशासाठी मार्श यांनी आखलेल्या योजनेला सुरुवातीलाच अडथळा निर्माण झाला आहे. दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढती यादी कॅनडाच्या त्या सुवर्णसंधीला धोक्यात आणत आहे.

यजमान कॅनडासाठी विश्वचषकात पहिला गोल करणारा कर्णधार अल्फोन्सो डेव्हिस ग्रुप बी मधील हा पहिला सामना खेळू शकणार नाही. गेल्या महिन्यात बायर्न म्युनिककडून खेळताना चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत झालेल्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला टोरोंटो स्टेडियमवर केवळ प्रेक्षक म्हणून उपस्थित रहावे लागले.

अल्फोन्सो डेव्हिसच्या अनुपस्थितीचा फटका बसलेला असतानाच, मार्सेलो फ्लोरेसच्या दुखापतीने संघाच्या अडचणीत आणखी भर घातली आहे. मेक्सिको सोडून कॅनडाकडून खेळण्याचा निर्णय घेतलेला हा मिडफिल्डर विश्वचषकाचे सहयजमान असलेल्या कॅनडासाठी एक मोठी जमेची बाजू मानला जात होता. मे महिन्यात गुडघ्याला झालेल्या दुखापतींमुळे फ्लोरेस पूर्णपणे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तसेच उझबेकिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात केवळ 30 मिनिटे खेळल्यानंतर बचावपटू मोईस

बॉम्बिटोच्या पायाचे फ्रॅक्चर बरे होण्याची प्रक्रियाही खुंटल्याचे दिसत आहे. कतार आणि स्वित्झर्लंडविरुद्धच्या गट फेरीतील सामन्यांसाठी डेव्हिसचे पुनरागमन अपेक्षित असतानाच कॅनडाच्या आशा पेलण्याची मोठी जबाबदारी जोनाथन डेव्हिडवर असेल. 39 गोलसह देशाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू असलेला डेव्हिड, विश्वचषकातील अनेक वर्षांची निराशा संपवण्यासाठी आतुर असलेल्या आक्रमक फळीचे नेतृत्व करेल.

मॅक्सिम क्रेपो, ज्याची गेल्या आठवड्यात कॅनडाचा मुख्य गोलकीपर म्हणून निवड झाली, त्याला अखेर विश्वचषकात खेळण्याची संधी मिळेल. कतारमधील स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी 15 दिवस आधी एमएलएस कपच्या अंतिम सामन्यात पाय मोडल्यामुळे त्याला 2022 च्या स्पर्धेला मुकावे लागले होते. स्पर्धेच्या सुरुवातीलाच कॅनडासमोर आव्हान असेल ते बोस्नियाच्या अनुभवी ड्रॅगन्सचे. चार वेळा चॅम्पियन राहिलेल्या इटलीविरुद्ध चमकदार कामगिरी करुन दुसऱ्यांदा विश्वचषकासाठी पात्र ठरलेला हा संघ आता सर्वात मोठ्या मंचावर परतला आहे. अनुभवी स्ट्रायकर एडिन झेको हा 2014 मधील बोस्नियाच्या पहिल्या विश्वचषक सहभागातील संघातून उरलेल्या केवळ दोन खेळाडूंपैकी एक आहे.

यजमान अमेरिका पॅराग्वेविरुद्ध विजयाने सुरुवात करण्यास उत्सुक

शनिवारी जेव्हा अमेरिका आपल्या यजमानपणाखालील विश्वचषकातील मोहिमेची सुऊवात ‘अंडरडॉग’ पॅराग्वेविऊद्ध करेल तेव्हा विजयासाठी त्यांच्यावर दबाव असेल. यापेक्षा कमी कामगिरी झाल्यास स्पर्धेच्या सहयजमानांच्या पुढील वाटचालीबद्दल चिंता निर्माण होऊ शकते. भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी 6.30 वा. होईल. जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानावर असलेला अमेरिका संघ ’गट डी’मधील सर्वोच्च मानांकन असलेला संघ आहे. याउलट पॅराग्वे हा स्पर्धेतील 48 संघांपैकी 41 व्या क्रमांकावर असलेला आणि ऑस्ट्रेलिया व तुर्की यांचाही समावेश असलेल्या या गटातील सर्वांत कमी मानांकन असलेला संघ आहे. सदर दक्षिण अमेरिकन संघाविऊद्ध अमेरिकेने सलग तीन सामने जिंकलेले असून ज्यामध्ये नोव्हेंबरमधील 2-1 अशा मैत्रीपूर्ण सामन्यातील विजयाचाही समावेश होतो.

जेव्हा हे संघ मैदानात उतरतील तेव्हा इंग्लवूडमधील लॉस एंजेलिस स्टेडियमचा माहोल उत्साहाने भरलेला असेल. वेस्टन मॅककेनी, ख्रिश्चन पुलिसिक आणि फोलारिन बालोगुन यांचा समावेश असलेल्या दमदार आघाडीफळीच्या जोरावर सुऊवातीलाच गोल करून सुऊवातीचे दडपण दूर करण्याचा प्रयत्न यजमान संघ करेल. मात्र भक्कम बचाव नसणे ही त्यांची कमकुवत बाजू आहे आणि त्यामुळे अननुभवी गोलरक्षक मॅट फ्रीझला कदाचित खूप मेहनत घ्यावी लागेल. अमेरिकेने गेल्या 13 सामन्यांमध्ये केवळ एकदाच प्रतिस्पर्ध्याला गोल करण्यापासून रोखले आहे आणि मागील चार सामन्यांत 11 गोल स्वीकारले आहेत. दुसरीकडे, पॅराग्वे दक्षिण अमेरिकेतील सहा थेट पात्र ठरणाऱ्या संघांमध्य शेवटच्या स्थानावर राहिले होते. 2010 च्या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत स्पेनकडून पराभव पत्करल्यानंतर हा संघ पहिल्यांदाच विश्वचषकात परतत आहे.

शनिवारचे सामने

1) कॅनडा वि. बोस्निया-हर्झेगोविना-वेळ : शुक्रवारी मध्यरात्री 12.30 पा.

2) अमेरिका वि. पराग्वे-वेळ : सकाळी 6.30 पासून


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​