Uncategorized
Ratnagiri Politics News : …तर यापुढे काँग्रेसने स्वतंत्र निवडणुका लढवाव्यात

चिपळूण : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराने घेतलेली माघार ही महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का असून, मित्रपक्ष आणि मतदारांच्या विश्वासाला तडा देणारी घटना असल्याची टीका काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी केली आहे.
महाविकास आघाडीतील अशा अविश्वसनीय उमेदवारांचा प्रचार करण्यापेक्षा यापुढे काँग्रेसने भविष्यात स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा गंभीरपणे विचार करावा, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. महायुतीकडे आधीच पुरेसे संख्याबळ आणि मतदारांचा पाठिंबा असताना विरोधी पक्षाच्या उमेदवाराला निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडणे हा भाजपचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.
Source link



