Uncategorized

Radhanagari monkey attack | अबब! ‘या’ गावाला चक्क एका वानराने सळो की पळो करुण सोडले अन्….

                                    सोळांकूरमध्ये पिसाळलेल्या वानराचा धुमाकूळ

सरवडे – सोळांकूर ता.राधानगरी येथे गेले चार दिवस एका पिसाळलेल्या वानराने अक्षरशा धुमाकूळ घातला असून गेल्या चार दिवसात तब्बल ६३ लोकांना जखमी केले आहे. जखमी पैकी दोघांना कोल्हापूर सीपीआर येथे पुढील उपचारासाठी पाठवले आहे.आज सोमवारी दिवसभरात १२ लोकांचा चावा घेतला तर आज अखेर ५५ लोकांना जखमी केले आहे. तसेच दुचाकी वर अचानक हल्ला करून अपघातात ७ लोकांना जखमी केले आहे. आतापर्यंत जखमींची संख्या ६३ वर गेली आहे.

या वानराच्या उच्छादाने सोळांकूर शासकीय भयभीत झाले आहेत. दिवसभर दारे खिडक्या बंद ठेवत आहेत. वानराच्या भितीने गावातील बाजारपेठेतील लाखोंचे व्यवहार ठप्प झाले आहेत. गेले दोन दिवस वनखात्याची २५ जणांची रेस्क्यू टीम व गावातील युवा वर्ग वानराच्या मागे धावत असले तरी वानर गुंगारा देण्यात पटाईत झाले आहे.वानर सापडत नसल्याने रेस्क्यू टीमसह ग्रामस्थही हैराण झाले आहेत. आज कोल्हापूर पशुवैद्यकीय टीम, राधानगरी व गारगोटी वनविभागाची रेस्कू टीम गेले तीन दिवस सोळांकूर गावांमध्ये वानर पकडण्यासाठी तळ ठोकून असून त्या टीमलाही आज दिवसभर वानराने चकवा दिलेला आहे. वनकर्मचारी व ग्रामस्थ यांनी वानराला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत.परंतु यश आलेले नाही.

काल दिवसभरात जखमींमध्ये काशिनाथ हनमंत लोहार, स्वराज अर्जुन मिरजकर, सुशांत रंगराव निचिते, नेताजी बाळासो यादव मनोहर बळवंत चौगले, संभाजी कृष्णात पाटील, मारुती पांडुरंग पाटील, (सर्वजण सोळांकुर), शिवाजी ज्ञानदेव पाटील (आकनुर) समीर दामोदर कांबळे (पनोरी) यांचा समावेश आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​