Uncategorized

Sangli News | गोटेवाडी रोडवरील ‘तो’ चौदावा मैल मळा! शुक्रवारच्या भरदुपारी नेमकं काय घडलं?

                           विसापूरजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

तासगाव : तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विसापूर गावाजवळ कार आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला असून या अपघातात युबराज ईश्वरा जाधव राहणार विसापूर या ५५ वर्षीय मोटरसायकलस्वारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातानंतर निष्काळजीपणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तासगाव पोलिसांनी एका बोलोरो गाडीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला
आहे.

याबाबतपोलीस सूत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी मयत युवराज जाधव की, हा अपघात शुक्रवार, २२ मे रोजी सकाळी ११:१५ वाजण्याच्या सुमारास विसापूर गावाच्या हद्दीत विसापूर-गोटेवाडी रोडवरील चौदाव्या मैल मळ्या येथील ताकारी कॅनॉलजवळ घडला. या घटनेतील मयत युबराज ईश्वर जाधव (वय ५५बर्षे, रा. विसापूर, ता. तासगाव, जि. सांगली) हे त्यांच्या ताब्यातील हिरो एचएफ डिलक्स मोटरसायकलवरून (एम एच १० डी डी ७९४४) विसापूर गावाकडून शेताकडे जात होते. ते ताकारी कॅनॉलजवळून जात असताना, रस्त्याकडेला उभी असलेली एक पांढ्या रंगाची बोलोरो गाडी (क्रमांकः एम एच ४२ ई ६९०५) चालक आशिष सतीश पवार (वय २७ वर्षे, रा. बलवडी (भा), ता. खानापूर, जि. सांगली) याने अचानक पुन्हा मुख्य रस्त्यावर घेतली.

यावेळी पाठीमागील वाहनांचा कोणताही अंदाज न घेता, अत्यंत हयगयीने, अविचाराने आणि रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालकाने गाडी अचानक पुढे आणल्यामुळे बोलोरो गाडीची धडक युबराज जाधव यांच्या मोटरसायकलला बसली. धडकेत युबराज जाधव हे गंभीर जखमी झाले त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​