Uncategorized

Sangli News | सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सने ४५ फूट खोल पाण्यातू न काही मिनिटांतच काढला विद्यार्थ्याचा मृतदेह!

                              जत तालुक्यातील विहिरीत बुडून सहावीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

जत : जततालुक्यातील वाळेखिंडी-लोणारवाडी येथे रविवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत विहिरीत पोहत असताना सहावीत शिकणाऱ्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मयत मुलाचे नाव हर्षद दत्तात्रय हिप्परकर (वय १३, रा. वाळेखिंडी, ता. जत, जि. सांगली) असे आहे. हर्षद हा दररोज आपल्या वडील व भावासोबत शेतातील विहिरीवर अंघोळ व पोहण्यासाठी जात होता. गेली तीन ते चार वर्षे तो पोहत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. रविवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या दरम्यान हर्षद विहिरीत पोहत असताना अचानक दम लागल्याने तो खोल पाण्यात बुडाला.

मुलगा बाहेर न आल्याचे समजताच काठावर असणाऱ्या वडिलांनी त्याला पाण्यात बुडून शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु विहिरीत जवळपास ४५ फूट पाणी असल्याने त्यासवाचवण्यास आणि वर काढण्यात त्यांना अडचण आली. तोवर शेजारचे लोक देखील जमा झाले होते, पण मुलास वाचवण्यास यश आले नाही.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जत पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवाजी शिंदे यांनी सांगली येथील रपेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाला कळविले. माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

आपत्ती व्यवस्थापन कमांडर कैलास वडर यांच्या मार्गदर्शनाखाली महेश गव्हाणे, सागर जाधव व आसिफ मकानदार यांनी बचाव व शोध मोहीम राबविली. सुमारे ४५ फूट खोल पाण्यात शोध घेत काही मिनिटांत हर्षदचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​