शासकीय साईटचा खोळंबा ; ११ वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी

आरपीडी कॉलेजच्या अकरावी प्रवेश मुदतीत वाढ करण्याची मागणी
सावंतवाडी :अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी आरपीडी ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असून फॉर्म भरण्यासाठी दिलेली दोन दिवसांची मुदत अपुरी पडत आहे. शासकीय संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरताना अडथळे येत आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी आणखी एक दिवस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत आहे. आरपीडी ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेसाठी २४०, वाणिज्य शाखेसाठी ४०० तर कला शाखेसाठी २४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांना आरपीडी कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांनी दिली.विद्यार्थ्यांनी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तातडीने प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
Source link



