अनेक फेस्टिव्हल गाजवलेल्या सुधागड ०७ चा उद्या विद्यापीठात स्पेशल शो

सुधागड ०७ हा एका आदिवासी कबड्डीपटूची चित्तथरारक आणि संघर्षमय कहाणी सांगणारा चित्रपट अनेक फेस्टिव्हलमध्ये नावाजला गेला आहे. या चित्रपटाची ८ महोत्सवात निवड झालीय तर ५ महत्त्वाचे पुरस्कार या चित्रपटाने जिंकले आहे. उद्या २१ मे सायंकाळी ५ वाजता या चित्रपटाचा विशेष शो कोल्हापुरात आयोजित करण्यात आला आहे.
कुठे असणार विशेष शो
शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री ग गो जाधव पत्रकारिता अध्यासनात या सुधागड ०७ या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला आहे. या चित्रपटानंतर दिग्दर्शक दिलीप रायन्नावार यांच्याशी संवाद साधण्याची संधी प्रेक्षकांना दिली जाणार आहे. या चित्रपटाचा विशेष शो हा प्रेक्षकांसाठी मोफत असणार आहे. तरी मोठ्या संख्येने चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी यावे अशी विनंती निमंंत्रक राहुल जाधव, पोपट सुर्यवंशी आणि जॉर्ज क्रुझ यांनी केली.
Source link



