#मेलोडी…मोदी आणि मेलोनींच्या फोटोंची इंटरनेटवर चर्चा

आपल्या पाच देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यासाठी रोममध्ये दाखल झाल्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या रस्त्यांच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर आपल्या ‘मैत्रीण’ आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत छायाचित्र काढले . ही छायाचित्रे बुधवारी इंटरनेटवर प्रचंड गाजली आणि इन्स्टाग्रामवर दोन तासांतच त्यांना २२ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले.
मेलोडी…मेलोनी आणि मोदी
पंतप्रधान मोदी आणि मेलोनी, ज्यांच्या मैत्रीमुळे ऑनलाइन ‘मेलॉडी’ पोस्ट्स तयार होतात, त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या संवादाने आणि एकत्र काढलेल्या फोटोंनी सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले. या दोन्ही नेत्यांनी यापूर्वी ‘मेलॉडी’ मीम्सवर प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि अनेकदा त्यात सहभागही घेतला आहे.
बुधवारी मेलोनीने पंतप्रधान मोदी यांनी ‘मेलोडी ‘ टॉफीचे पॅकेट भेट देत असल्याचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर #मेलोडी मुव्हमेंट शिगेला पोहोचली . “भेटवस्तूबद्दल धन्यवाद,” असे मेलोनी यांनी व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले.
पंतप्रधान मोदींनी मेलोनींसोबतचे फोटो शेअर केल्यावर मेलोनींनीही काही फोटो शेअर केले. त्यात त्यांनी लिहिले “रोममध्ये आल्यानंतर, पंतप्रधान मेलोनींना रात्रीच्या जेवणावेळी भेटण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर आम्ही प्रतिष्ठित कोलोसियमला भेट दिली. आम्ही विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण केली,”
मोदींच्या कॅप्शनची चर्चा.



