Uncategorized

Ashta news | क्षुल्लक वाद अन् जीवघेणा हल्ला! वाळवा तालुक्यात शेतकऱ्याला कोयता आणि काठीने बेदम मारहाण

                                क्षुल्लक कारणावरून शेतकऱ्यावर हिंसक हल्ला

आष्टा: शेत जमिनीतीलपावसाच्या पाण्याचे गटर साफ करण्याच्या क्षुल्लक कारणावरून बहादूरवाडी (ता. वाळवा) येथे एका शेतकऱ्यावर कोयता आणि काठीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दोन संशयित आरोपींविरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनाजी वसंत घोरपडे (रा. बहादूरवाडी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या फिर्यादी शेतकऱ्याचे नाव आहे. तर रमेश बाळासो घोरपडे आणि बाळासो आनंदा घोरपडे (दोघे रा. बहादूरवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

१३ मे रोजी सकाळी फिर्यादी धनाजी घोरपडे हे शेतात काम करत होते. पावसाच्या पाण्यामुळे शेतातील सार्वजनिक गटर तुंबलीहोती. त्यामुळे धनाजी हे साफ करत होते आणि त्यातील केरकचरा काढून स्वतःच्या शेतजमिनीत टाकत होते. मात्र, हा कचरा आपल्या शेतात टाकत असल्याचा गैरसमज आरोपी रमेश घोरपडे आणि त्याचे वडील बाळासो घोरपडे यांनी करून घेतला. याच कारणावरून धनाजी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

बाद विकोपाला गेल्याने संशयित आरोपी बाळासो घोरपडे यांनी कोयत्याने फिर्यादी धनाजी यांच्या डोक्यात बार केला. यात धनाजी गंभीर जखमी झाले. तर त्यांचा मुलगा रमेश घोरपडे याने काठीने धनाजी यांच्या डाव्या हाताच्या पोटरीवर आणि डोक्यात जबर मारहाण केली.मारहाण एवढ्या थांबली नाही, तर पुन्हा गटरीचे पाणी आणि घाण माझ्या शेतात टाकलीस, तर तुला बघून घेईन, अशी जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ केली.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​