Uncategorized

अमानवी …पाण्याच्या बादलीला स्पर्श केला म्हणून दलित मुलाला दिली अमानुष शिक्षा

उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साचेंडीमध्ये, अनुसुचित जातीच्या मुलाला पाण्याच्या बादलीला स्पर्श केल्याच्या कारणावरुन अमानुष मारहाण करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा एका तहानलेल्या अनुसूचित जातीच्या किशोरवयीन मुलाने उच्च जातीच्या तरुणाच्या पाण्याच्या बादलीला स्पर्श केला, तेव्हा त्या तरुणाने आपल्या भावासह आणि दोन मित्रांसोबत मिळून त्या मुलाला अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे,.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या  बुटांवर थुंकून ते चाटायला लावले, त्यानंतर त्याच बुटांमध्ये पाणी भरून ते पिण्यास भाग पाडले. इतकेच नाही, तर त्याला नग्न करून बेदम मारहाण केली. यामुळे मुलाचा हात फ्रॅक्चर झाला. लोकांनी मध्यस्थी केल्यावर त्याची सुटका करण्यात आली. पीडित मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून, पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती कायद्यासह विविध कलमांखाली चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मुलाला तहान लागली अन्

गावकऱ्याच्या म्हणण्यानुसार, २ मे च्या रात्री तो किशोरवयीन मुलगा शेतात काम करत होता. यावेळी त्याला तहान लागली. आरोपींपैकी एक जण शेताजवळ, संजयच्या घरासमोरील सरकारी पाण्याच्या टाकीजवळ गेला. तिथे एक बादली आणि एक घागर ठेवलेली होती. तो किशोरवयीन मुलगा त्यातून पाणी पिऊ लागला. याच गोष्टीचा आरोपीला राग आला आणि त्याने मुलाला अमानवी शिक्षा दिली.

नेमकं काय घडलं?

असा आरोप आहे की, आरोपी संजय, त्याचा भाऊ दीपक, त्याचे मित्र सागर आणि पाटिया यांनी त्याला जातीयवादी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर, त्यांनी त्याचे कपडे काढून त्याला कोंबड्यासारखे उभे केले. आरोपींनी मुलाला काठ्यांनी आणि लाथा-बुक्क्यांनी मारले. यामुळे त्याचा हात मोडला. आरोपी इथेच थांबले नाहीत त्यांनी मुलाला अजुन जबरी शिक्षा देण्याचे ठरवले.

त्यांनी त्या किशोरवयीन मुलाला त्यांच्या बुटांवरची थुंकी चाटायला लावली आणि त्याच बुटांमधील पाणीही प्यायला लावले. हे दृश्य पाहून गावकऱ्यांची गर्दी जमू लागली. गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

तपास सुरू आहे.

पीडितेच्या वडिलांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साचेंडीचे निरीक्षक दिनानाथ म्हणाले, “चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पुढील कारवाई केली जाईल.”


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​