अमेरिकेच्या कारवाईत आयएसचा कमांडर ठार

नायजेरियाच्या मदतीने आफ्रिकेत कारवाई
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादी संघटना ‘आयएस’चा दुसऱ्या क्रमांकाचा कमांडर अबू बिलाल अल-मिनुकी ठार झाल्याचा दावा केला आहे. अमेरिकन लष्कराने नायजेरियन सैन्याच्या सहकार्याने आफ्रिकेत ही कारवाई केली. ही कारवाई अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करून आणि मोठ्या कष्टाने पार पाडण्यात आली. अबू बिलाल अल-मिनुकी हा आफ्रिकन देशांमध्ये लपून बसला असताना त्याला लक्ष्य करण्यात आल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. हा दहशतवादी जगातील सर्वात सक्रिय दहशतवाद्यांपैकी एक होता. त्याला संपवण्यासाठी बऱ्याच काळापासून त्याच्यावर पाळत ठेवली जात होती. त्याच्या हत्येमुळे ‘आयएस’च्या निधी पुरवठा जाळ्याला आणि नियंत्रण प्रणालीला मोठा धक्का बसला आहे. तथापि, ही कारवाई कुठे आणि केव्हा झाली याचा संपूर्ण तपशील अद्याप उपलब्ध नाही. आफ्रिकेत हा हल्ला नेमका कुठे झाला हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले नाही, परंतु ही कारवाई नायजेरियाच्या मदतीने करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Source link



