Uncategorized

सुवेंदू यांना धमकी देणाऱ्यास अटक

आत्मघाती बॉम्बहल्ला करण्याच्या इशाऱ्यानंतर कारवाई

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोलकातामध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हसनैन इक्बालला शुक्रवारी रात्री कोलकाताच्या गार्डन रीच परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर चौकशीअंती त्याच्यावर गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यावर आत्मघाती बॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिल्याचा हसनैनवर आरोप ठेवण्यात आला आहे. ही धमकी 14 मे रोजी भवानीपूर पोलीस ठाण्याला मिळाली होती. यात अल कायदाच्या मदतीने मुख्यमंत्र्यांवर आत्मघाती बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देणारा एक ईमेल प्राप्त झाला होता. हसनैनच्या अटकेनंतर कोलकाता पोलीस आता सायबर सेल आणि विशेष कृती दल (एसटीएफ) यांच्या संयुक्त मदतीने पुढील तपास करत आहेत.

 

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​