Uncategorized

CET Student Accident: मित्रासारख्या लेकासोबत बापाचा शेवटचा प्रवास, डोळ्यासमोर गेला जीव

या अपघातात दोघेही जखमी होऊन रस्त्यावरच पडले

कोल्हापूर : मुलाला सीईटी परीक्षेसाठी सोलापूरला घेऊन गेलेल्या पोलिसाच्या मोटारसायकलची आणि ट्रकची धडक झाली. कवठेमहांकाळ येथे रात्री झालेल्या या अपघातात मुलगा हरीप्रसाद संताजी चव्हाण (वय 18) याचा मृत्यू झाला.

वडील कॉन्स्टेबल संताजी शीलवंत चव्हाण (वय 48, रा. कोल्हापूर) गंभीर जखमी झाले आहेत. मुलाच्या वाट्याला आलेली अशी अकल्पीत जीवघेणी परीक्षा पाहून पोलिसाच्या रूपात दडलेला बाप हबकून गेला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

काल रात्री कवठेमहांकाळ जवळ झालेल्या ट्रकमोटारसायकल अपघातात हरीप्रसाद संताजी चव्हाण याचा मृत्यू झाला. कॉन्स्टेबल संताजी चव्हाण गंभीर जखमी झाले आहेत. संताजी चव्हाण हे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात हवालदार आहेत. त्यांचा मुलगा हरीप्रसाद याची सीईटीची परीक्षा बुधवारी सोलापूर येथे होती. मुलाला परीक्षेसाठी मोटरसायकलवरून घेऊन चव्हाण हे सोलापूरला गेले होते.

मुलाची परीक्षा झाल्यानंतर थेट पुन्हा ते परत कोल्हापूरला न येता स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे गेले. तेथून दर्शन घेऊन परत येताना रात्री साडेनऊच्या सुमारास कवठेमहांकाळजवळ रिव्हर्स सळीच्या ट्रकचा अंदाज न आल्याने त्या ट्रकला मागून चव्हाण यांची मोटारसायकल धडकली.

या अपघातात दोघेही जखमी होऊन रस्त्यावरच पडले. त्यांना उपचारासाठी मिरजेस नेले. पण त्यापूर्वी हरीप्रसाद याचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी त्याच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संताजी चव्हाण यांच्यावर कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अपघातात संताजी चव्हाण यांच्या हाताला, शरीरावर जखमा झाल्या आहेत.

मुलाच्या झालेल्या मृत्यूचा धक्का संताजी चव्हाण सहन करू शकलेले नाहीत. त्यांना या धक्क्यातून कसे सावरायचे, हा प्रश्न नातेवाईक आणि मित्र परिवाराला पडला आहे. संताजी चव्हाण यांचा पोलीस खात्यात आणि बाहेरही मोठा मित्रपरिवार आहे. ते कोल्हापूर पोलीस फुटबॉल संघाचे माजी खेळाडू आहेत. अपघाताचे वृत्त कळताच दवाखान्यात त्यांच्या मित्रपरिवारांची गर्दी झाली होती.

बापलेक मित्रासारखे

संताजी चव्हाण यांचा मुलगा हरीप्रसाद हुशार होता. आयपीएस करण्याचा त्यांचा संकल्प होता. त्यामुळे आत्तापासून त्यांची तयारी सुरू होती. बापलेकाचे प्रेम इतके की दोघेच कायम एकत्र असायचे. दर रविवारी न चुकता दोघेच जोतिबा डोंगराला जायचे. पाकाळणीला तर दोघेही चालत जायचे.

नशिबाने अशी जीवघेणी परीक्षा का घेतली ?

संताजी चव्हाण आणि त्यांचा मुलगा हरीप्रसाद याला उपचारासाठी मिरजेत आणले होते. त्यावेळी बेडवर दोघे शेजारी शेजारीच होते. या वेळेपर्यंत संताजी चव्हाण यांना बऱ्यापैकी झालेल्या अपघाताचे भान आले. शेजारी जखमी हरीप्रसादला पाहून ते हाका मारू लागले.

हाताने त्याला हलवण्याचा प्रयत्न करू लागले. पण हरीप्रसादकडून काहीही प्रतिसाद न आल्याने काहीतरी अघटीत घडल्याचे त्यांच्या लक्षात आले. नशिबाने मुलाची अशी जीव घेणी परीक्षा का घेतली. हाच प्रश्न ते सातत्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी येणाऱ्यांना विचारत होते. पण समोरच्या कोणाकडेही त्याचे उत्तर नव्हते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​