Uncategorized

ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये यांची कॅन्टोन्मेंटला भेट

शाळा, हॉस्पिटल, कार्यालयाला दिली भेट

बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावचे कमांडंट व बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे अध्यक्ष ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये यांनी शुक्रवारी कॅन्टोन्मेंट बोर्डला भेट दिली. कमांडंट पदाचा कार्यभार स्वीकारताच त्यांनी कॅन्टोन्मेंटला भेट देऊन येथील प्रशासकीय कार्यालय, हॉस्पिटल, शाळा, पटांगणाला भेट देऊन तेथील माहिती जाणून घेतली. यापूर्वीचे कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांची कोलकाता येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी कॅन्टोन्मेंटचे सीईओ सुदाम मंचलवार व सरकारनियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनी ब्रिगेडियर उपाध्ये यांचे स्वागत केले. बेळगाव कॅन्टोन्मेंटविषयी त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या विकासासाठी आपण सदैव सहकार्य करू, अशी भूमिका ब्रिगेडियर उपाध्ये यांनी मांडली. यावेळी कॅन्टोन्मेंटच्या अधिकारी व तसेच कर्मचाऱ्यांची त्यांनी ओळख करून घेतली. कॅन्टोन्मेंटमधील शाळा, हॉस्पिटल यामध्ये कोणतीही कमतरता राहू नये, याची खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​