Satara Crime | व्हॉट्सअॅप पोस्टचा गैरसमज नडला! साताऱ्यात घरात घुसून महिलेला बेदम मारहाण

साताऱ्यात एकाच समाजातील दोन गटांत राडा
सातारा : व्हॉट्सअॅप ग्रुपवरटाकलेल्या एका पोस्टवरून गैरसमज झाल्याने दोघांनी एका महिलेच्या घरी बेकायदेशीर प्रवेश करून मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना मौजे सासपडे येथे घडली आहे. याबाबत साबिया उमरफारुख सुतार (वय ३३, रा. सासपडे, ता. जि. सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, समाजातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘बाघ व गाढवा संदर्भातील पोस्ट तिच्यापतीनेच टाकल्याचा गैरसमज करून मुकंदर कमरुद्दीन मुलाणी व सिकंदर मुकंदर मुलाणी (दोघे रा. सासपडे, ता. जि. सातारा) यांनी फिर्यादीच्या घरात परवानगीशिवाय प्रवेश केला.
घरात घुसल्यानंतर दोघांनी फिर्यादीला हाताने तोंडावर मारहाण केली तसेच तिच्या पतीबाबत अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी “तू घराबाहेर भेट, तुला दाखवतोच अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.बोरगाव पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला हवालदार जाधव करत आहेत.
Source link



