Uncategorized

खानापूर रोडवर गटारीचे झाकण उघडे असल्याने वाहतुकीस धोका

बेळगाव : खानापूर रोड, ग्लोब टॉकीजनजीक गटारीचे झाकण उघडे असल्याने नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. गटारीला लोखंडी झाकण नसल्याने गटार उघडीच आहे. सदर रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र प्रमुख रस्त्यापैकी एक असलेल्या या मार्गावरील गटार उघडी असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गटारीला झाकण लावून ती बंद करण्याची मागणी होत आहे.

शहरातील खानापूर रोड, ग्लोब टॉकीजजवळील गटारीचे लोखंडी झाकण गायब झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गटार पूर्णपणे उघडे पडले असून, या ठिकाणी अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. खानापूर रोड हा शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा मार्ग मानला जातो. या रस्त्यावरून दररोज हजारो लहान-मोठी वाहने तसेच पादचारी ये-जा करत असतात. मात्र रस्त्यालगत असलेली गटार उघडी असल्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

विशेषत: रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात हे उघडे गटार लक्षात न आल्यास दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक किंवा पादचारी यांचा तोल जाऊन गंभीर अपघात होण्याची शक्मयता आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​