Ratnagiri News: अखेर देवरुख रुग्णालयाच्या काचा बदलण्याचे काम सुरु

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे
देवरुख : शहरातील ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभारताना काचेचा वापर करण्यात आला आहे. पावसाळ्यात या काचेतून पाणी आतमध्ये जात असल्याने समस्यांना सामोरे जावे लागत होते. या काचा बदलण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.
दोन वर्षातच अशी अवस्था झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यावरून अधिकारी वर्गाचे अयोग्य नियोजन, कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीला अनेक वर्षांचा कालावधी लोटल्याने तसेच जागा अपुरी पडू लागल्याने कोट्यवधीचा निधी खर्च करून सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. मात्र या इमारतीला प्रारंभीपासून दृष्ट लागली आहे.
२८ ऑगस्ट २०२४ रोजी या इमारतीचे उदघाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते थाटात करण्यात आले. उद्घाटनानंतर काही दिवसांतच भिंतीला लावलेल्या लाद्या खाली कोसळल्या. घोकादायक लाद्या काढून पुन्हा लावण्यात आल्या. अपुऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांमुळे रूग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांची कारभार हाकताना मात्र मोठी दमछाक होत आहे.
दुर्लक्ष झाल्याने संताप
दुसऱ्या मजल्यावरील हॉलला काचा लावण्यात आल्या आहेत. मात्र दोन वर्षाच्या आतच पावसाचे पाणी आत जाऊ लागले आहे. यामुळे भिंतीला ओलाबा मारत आहेत. परिणामी काचा बदलण्याची मोहीम पुन्हा जामाने हाती घेण्यात आली आहे. मात्र इमारतीचे डिझाईन करताना, प्रत्यक्षात काम करताना अभियंत्यांच्याही बाब लक्षात येणे गरजेचे होते. यावरून इमारत बांधकामाकडे अभियंत्यांचे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे.
काम सुरू झाल्याचा फलक
पावसाळा काही दिवसांबर येऊन ठेपला आहे. तत्पूर्वी काम मार्गी लागणे आवश्यक आहे. रूग्णालयाचे कामकाज चालू असल्याने रूग्णालयात जाण्याचा मार्ग मागील बाजूने केला आहे असा फलक दर्शनी भागात लावण्यात आला आहे.
डॉ. माने काय म्हणाले?
याबाबत वेवरुख ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप माने यांच्याशी संपर्क साथला असता, पावसाळ्यात काचेतून पाणी आत जाऊन भिंतीला ओलावा मारतो. यावर उपाययोजना करणे गरजेचे होते. बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी काचा बदलून काही ठिकाणी खिडकी करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार कामाला देखील प्रारंभ झाल्याचे डॉ. माने यांनी नमूद केले आहे. येऊन ठेपला आहे. तत्पूर्वी काम मार्गी लागणे आवश्यक आहे. रूग्णालयाचे कामकाज चालू असल्याने रूग्णालयात जाण्याचा मार्ग मागील बाजूने केला आहे असा फलक दर्शनी भागात
Source link



