राष्ट्रकुल टेटे स्पर्धेचे यजमानपद दिल्लीला

वृत्तसंस्था, नवी दिल्ली
2026 मध्ये होणाऱ्या 22 व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेचे यजमानपद दिल्ली भूषविणार आहे. सदर स्पर्धा दिल्लीतील त्यागराज स्टेडीयमवर 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. सदर स्पर्धा अखिल भारतीय टेबल टेनिस फेडरेशन आणि दिल्ली प्रशासन यांच्या संयुक्त यजमान पदाने भूषविली जाणार आहे. सदर माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सदर स्पर्धेमध्ये 35 देशांचे टेबल टेनिसपटू सहभागी होणार आहेत. जागतिक क्रीडा नकाशामध्ये आता दिल्लीचे स्थान अधिक मजबूत झाल्याचे दिसून येते. दिल्ली शासनाकडून नेहमीच क्रीडा आणि संस्कृतीला अधिक प्राध्यान्य यापुढे दिले जाईल, असे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या स्पर्धेमुळे भारतीय टेबल टेनिसपटुंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपली दर्जेदार कामगिरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या स्पर्धेसाठी सुसज्ज असे स्टेडीयम उपलब्ध करुन दिले जाईल. या स्टेडीयममध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा पुरविल्या जातील.
या स्पर्धेमध्ये यजमान भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, सिंगापूर, स्कॉटलंड, वेल्स, नायजेरिया, केनिया, जमैका, त्रिनिदाद-टोबॅगो या देशांचे स्पर्धक सहभागी होतील. सदर स्पर्धा 7 दिवस चालणार असून 2 ऑगस्ट रोजी या स्पर्धेतील अंतिम सामने खेळविले जातील. सदर स्पर्धा दिल्लीच्या त्यागराज स्टेडीयमवर घेतली जाणार आहे. 2026 च्या ऑलिम्पिक मिशन व्हिजनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी संपूर्ण देशात सुसज्ज मैदाने, स्टेडीयम्स नव्याने तयार करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
Source link



