Uncategorized

“आम्हाला एकत्र यायला २५ वर्षे लागली” हरवलेली फिल्म मिळताच विद्या इरफानच्या आठवणीत भावूक

Irrfan khan- Vidya Balan short film : आपल्या बोलक्या डोळ्यांनी प्रेक्षकांना वास्तवदर्शी, नैसर्गिक अभिनयाने वेड लावणाऱ्या दिवंगत अभिनेता इरफान खानची 25 वर्षांपुर्वीची शॉर्ट फिल्म अखेर युट्युबवर रिलीज झाली आहे. विशेष म्हणजे या शॉर्ट फिल्ममध्ये इरफान आणि विद्या बालनने स्क्रीन शेअर केली आहे.  इरफान खान (Irfan Khan) आणि अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) यांची तब्बल 25  वर्षांपूर्वी शूट झालेली ‘द लास्ट टेनंट’ ही शॉर्ट फिल्म अखेर रिलीज झाली. इरफान यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त ही फिल्म यूट्यूबवर रिलीज झाली आणि काही क्षणांतच या फिल्मचा बोलबाला झाला. इरफान खान यांच्या आठवणींनी पुन्हा एकदा चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत.

विशेष म्हणजे, ही फिल्म त्या काळात शूट झाली होती जेव्हा विद्या बालन आणि इरफान खान दोघेही त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात होते. पण नशिबाने वेगळंच काही ठरवलं होतं. ओरिजिनल फुटेज हरवल्यामुळे हा चित्रपट कधीच रिलीज होऊ शकला नाही. 25 वर्षांनी जेव्हा ही फिल्म पुन्हा समोर आली, तेव्हा केवळ चाहतेच नाही तर स्वतः विद्या बालनही भावूक झाली.

विद्या बालनने शेअर केला व्हिडिओ 

अभिनेत्री विद्या बालनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘द लास्ट टेनंट’ या चित्रपटातला एक व्हिडीओ शेअर करत सोबत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. विद्याने त्यात लिहिले आहे “काल रात्री मी पहिल्यांदाच ‘द लास्ट टेनंट’ पाहिली, कारण या चित्रपटाचं शूटिंग मी तब्बल 25 वर्षांपूर्वी केलं होतं. शूटिंग पूर्ण झालं, पण काही कारणांमुळे हा चित्रपट कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही. तो काळ असा होता की, मी ज्या कोणत्या गोष्टीला हात लावत होते, अपूर्ण राहायची. माझा पहिला मल्याळम चित्रपट ‘चक्रम’ बंद पडला आणि त्यानंतर पुढची तीन वर्षं मला जवळपास डझनभर चित्रपटांतून रिप्लेस करण्यात आलं.

 विद्या बालन झाली भावूक 

पुढं लिहिताना विद्या म्हणते “थोडक्यात सांगायचं तर, त्या काळात ज्या गोष्टी पूर्ण होऊ शकल्या नाहीत, त्यांच्यासारखंच हेही विसरून जाणंच मला योग्य वाटलं… आणि मी तसंच केलं. मी त्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात दडवून ठेवल्या… गेल्या आठवड्यापर्यंत. गेल्या आठवड्यात दिग्दर्शक @sarthak_dasgupta यांचा मला मेसेज आला आणि त्यांनी सांगितलं की हा चित्रपट यूट्यूबवर रिलीज झाला आहे.आणि मग अचानक एक धूसर आठवण पुन्हा डोळ्यांसमोर आली. मला आठवतंय, शूटिंग सेटवरून मी उत्साहाने माझ्या बहिणीला फोन करून सांगितलं होतं की मी ‘बनेगी अपनी बात’मधील इरफान खानसोबत शूटिंग करत आहे. त्या वेळीही मला ते सर्वात नैसर्गिक अभिनेता वाटायचे आणि काल रात्री चित्रपट पाहतानाही मला अगदी तसंच वाटलं. त्यांच्या अभिनयात कधीच कृत्रिमपणा नव्हता”.

https://www.instagram.com/p/DYCWDZKtZVh/

इरफानच्या आठवणी…

इरफान खानबद्दल बोलताना विद्या अक्षरशः भारावून गेली. इरफानच्या जाण्यानंतर मला नेहमीच याचं वाईट वाटत राहिलं की, आम्ही दोघं एकत्र झळकणार असलेले काही चित्रपट काही ना काही कारणामुळे बनू शकले नाहीत. पण आता निदान ‘द लास्ट टेनंट’ तरी माझ्याकडे आहे!! धन्यवाद, @sarthak_dasgupta माझ्या फेलो कॅप्रिकॉर्न #IrrfanKhan, आपल्या नशिबाला एकत्र यायला 25 वर्षं लागली… पण अखेर ते घडलं.” या शब्दांनी तिने चाहत्यांनाही भावूक केलं. ‘द लास्ट टेनंट’ ही शॉर्ट फिल्म 29 एप्रिल रोजी The Salt Inc या यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आली असुन या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन सार्थक दासगुप्ता यांनी केलं असून, नीना दासगुप्ता यांनी सहनिर्मिती केली आहे.




Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​