दाणोली हायस्कूलचा SSC निकाल १०० टक्के

उज्ज्वल यशाची परंपरा कायम
ओटवणे : प्रतिनिधी
दाणोली येथील कै. बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाचा एस. एस. सी. परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून या प्रशालेने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या प्रशालेतून परीक्षेला बसलेले सर्व २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ११ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.या परीक्षेमध्ये कु. हर्षदा सचिन पाटील हिने ८८.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला. कु. श्रावणी विजय सावंत हिने ८७ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. सृष्टी मनेश नाईक हिने ८६ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक संपादन केला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन केले आहे.
Source link



