Shaktipeeth Highway | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’वरून कोल्हापुरात शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद ?

शक्तीपीठ महामार्गावर आमदार नरके-क्षीरसागर आमनेसामने
कोल्हापुर– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गावरून आता कोल्हापुरात शिवसेनेतचं मतभेद असल्याचं समोर आलंय..शक्तीपीठ महामार्गावरुन आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार चंद्रदीप नरके यावरुन आमनेसामने आलेतं..कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाची अलाइनमेंट बदलल्याने करवीरमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे..करवीर विधानसभा मतदारसंघातील 18 गावातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलायं..
त्यामुळे आमदार चंद्रदीप नरके यांनीही करवीर मधून विरोध करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलंय..आणि हा महामार्ग करवीर मतदारसंघातून जाऊ नये अशी मागणी केली आहे..दरम्यान या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी विरोधक शक्तीपीठाला विरोध करत आहेत..म्हणून सत्ताधारी आमदारानी आणि लोकप्रतिनिधींनीही विरोध करणं योग्य नाही..विरोधकांची भाषा आमदार चंद्रदीप नरके यांनी करू नये असं स्पष्ट आमदार क्षीरसागर यांनी आमदार नरके यांना सुनावलं..
शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमदार चंद्रदीप नरके यांची ही भाषा खपवून घेणार नाहीत असही आमदार क्षीरसागर यांनी म्हटलंय..त्यामुळे शक्तीपीठ महामार्गावरुन शिवसेना आमदार चंद्रदीप नरके आणि राजेश क्षीरसागर यांच्यात शाब्दिक संघर्ष रंगला आहे.
Source link



