Uncategorized

लँडिंगवेळी इमर्जन्सी एक्झिटमधून प्रवाशाची उडी

चेन्नई विमानतळावर घटना : प्रवाशाला अटक : सुरक्षा यंत्रणा सतर्क

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूच्या चेन्नई विमानतळावर एक विचित्र घटना घडली आहे. विमानतळावरील टॅक्सीवेवर विमान पोहोचले असता एका प्रवाशाने इमर्जन्सी एक्झिटचा दरवाजा उघडत खाली उडी घेतली. यामुळे विमानतळावर काही वेळासाठी तणाव फैलावला. विमानो•ाणांना विलंब होत अनेक मार्गावरील विमानांना डायवर्ट करावे लागले. तर विमानतळाचे कामकाजही काही वेळासाठी बंद झाले.

एअर अरेबियाचे विमान शारजाह येथून 231 प्रवाशांसह चेन्नई येथे पोहोचले होते. विमान टॅक्सीवे-रनवे आणि टर्मिनलला जोडणाऱ्या मार्गाच्या दिशेने जात असताना पुदुकोट्टई येथील रहिवासी असलेल्या 34 वर्षीय प्रवाशाने इमर्जन्सी एक्झिटचा दरवाजा उघडला. यानंतर वैमानिकाने त्वरित विमान रोखत विमानतळ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. मग त्वरित सीआयएसएफचे जवान, बॉम्बविरोधी पथक आणि अधिकाऱ्यांनी विमानाच्या दिशेने धाव घेतली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संबंधित प्रवाशाला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. संबंधित प्रवाशाचे नाव मोहम्मद शरीफ मोहम्मद नजमुद्दीन असल्याचे समोर आले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​