Dahivadi crime news | प्रेमविवाहाचा राग नडला! मेव्हण्यावर चाकूने जीवघेणा हल्ला; गोंदवल्यात थरार

दहिवडी तालुक्यात चाकूहल्ला;
दहिवडी : बहिणीने पळून जाऊनप्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून, तिच्या पतीवर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथे घडली आहे. या हल्ल्यात हणमंत लक्ष्मण दौंड (वय ३२. रा. पळशी) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या खिशातील एक लाख रुपयेही पळवण्यात आल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हणमंत दौंड हे २४ एप्रिल रोजी दुपारी १२:४५ च्या सुमारास आपले नातेवाईक दाजी काळे आणि विनायक ढोले यांच्यासोबत दुचाकीवरून पळशीकडे जात होते. गोंदवले ते म्हसवड रस्त्यावरील मटन शॉ पच्या समोरील बंद टपरीजवळआले असता, गणेश तात्याबा ढोले (रा. पळशी) याने त्यांना थांबवले. गणेशने सुरुवातीला ‘सोने सोडवले का अशी विचारणा केली आणि त्यानंतर माझी बहीण भाग्यश्री डिला पळून नेऊन लग्न का केले? असा जाब विचारत अचानक हातातील चाकूने हणमंत यांच्या उजव्या बरगडीवर वार केला. याचवेळी तिचे आलेल्या इतर ४ ते ५ अनोळखी इसमांनी हणमंत यांना पकडून ठेवले आणि चाकूने खांद्यावर, डोळ्याखाली वार करून गंभीर जखमी केले. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या दाजी काळे आणि विनायक ढोले यांनाही मारहाण करण्यात आली. हणमंत हे रक्ताच्या थारोळ्यात पडले असता, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी हणमंत यांच्या खिशातील १ लाख रुपयांची रोकड काढून नेली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
Source link



