Uncategorized

Sangli news | गाणे लावण्याचा वाद विकोपाला! सांगलीत घरात घुसून नोकरदाराला बेदम मारहाण

                       सांगलीत गाण्याच्या वादातून नोकरदारास बेदम मारहाण

सांगली : सलाम संविधान याकार्यक्रमात आवडीचे गाणे लावण्याच्या कारणावरुन झालेल्या वादाचा राग मनात धरुन नोकरदारास त्याच्या घरात घुसून जबर मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी रात्री आठ च्या सुमारास मौजे डिग्रज येथे झेंडा चौकात घडली.

याप्रकरणी योगेश नागेश कांबळे (रा. मौजे डिग्रज) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शुक्रबार १७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नवबुध्द व्यायाम मंडळाच्या वतीने सलाम गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

त्यावेळी फिर्यादी योगेश आणि संशयित गजानन कांबळे यांच्यात आवडीचे गाणे लावण्यावरुन शाब्दीक बाद झाला होता. याचा राग मनात धरुन रविवारी रात्री फिर्यादी योगेश कांबळे हे जेवत होते. त्यावेळी तेथे संशयित दिपाली कांबळे, गजानन कांबळे, पृथ्वीराज कांबळे, गजानन कांबळे यांचा मेव्हणा तेथे आले. त्यांनी योगेश यांना मारहाण केली. यानंतर योगेश यांना झेंडा चौकात घेवून गेले. तेथे योगेश आवळे आणि १० ते १५ अनोळखी साथीदारांनी पुन्हा मारहाण केली.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​