Uncategorized

भारतीय महिलांचा द. आफ्रिकेवर 14 धावांनी विजय

सामनावीर दीप्ती शर्माची अष्टपैलू कामगिरी, जेमिमाचे उपयुक्त योगदान, रिचा घोषची फटकेबाजी

वृत्तसंस्था, जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका)

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील येथे झालेल्या चौथ्या सामन्यात सामनावीर दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा 14 धावांनी पराभव केला. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने यापूर्वीच सलग तीन सामने जिंकून विजयी आघाडी मिळवली आहे.

या चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 20 षटकात 5 बाद 185 धावा जमविल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 9 बाद 171 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. भारताच्या दीप्ती शर्माने टी-20 प्रकारात पहिल्यांदाच 5 गडी बाद केले. तसेच तिने फलंदाजीत 26 चेंडूत नाबाद 36 धावा झळकाविल्या.

भारताच्या डावामध्ये रॉड्रिग्जने 29 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 43 तर रिचा घोषने 18 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 34, दीप्ती शर्माने 26 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 36, अनुष्का शर्माने 18 चेंडूत 4 चौकारांसह 27, कर्णधार हरमनप्रीत कौरने 16 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 22 धावा केल्या. शेफाली वर्मा 1 षटकारासह 9 धावावर बाद झाली. दीप्ती शर्मा आणि रिचा घोष यांनी सहाव्या गड्यासाठी अभेद्य 65 धावांची भागिदारी केल्याने भारताला 185 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताच्या डावात 5 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. भारताने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 47 धावा जमविताना 2 गडी गमाविले. 10 षटकाअखेर भारताची स्थिती 2 बाद 77 अशी होती. दक्षिण आफ्रिकेतर्फे इलिझ मार्क्स आणि रिनेकी यांनी प्रत्येकी 2 तर सेकुकूने 1 गडी बाद केला. रॉड्रिग्जला 18 धावांवर असताना जीवदान मिळाले. पण या जीवदानाचा ती अधिक लाभ घेऊ शकली नाही. भारताने शेवटच्या 5 षटकात 56 धावा फटकावल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना दीप्ती शर्माच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज अधिक धावा जमवू शकले नाहीत. या मालिकेतील गेल्या 3 सामन्यात फलंदाजीत सातत्य राखणारी कर्णधार वूलव्हार्ट क्रांती गौडच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली. तिने 14 चेंडूत 4 चौकारांसह 18 धावा जमविल्या. सुने लूसने 24 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 40 तर ब्रिट्सने 23 चेंडूत 5 चौकारांसह 30 धावा जमविल्या. डर्कसनने 1 षटकारासह 9 धावा केल्या. रिनेकीने 19 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 21 तर मार्क्सने 13 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 21 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 7 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 59 धावा जमविताना 1 गडी गमाविला. दक्षिण आफ्रिकेने 10 षटकाअखेर 2 बाद 92 धावा जमविल्या होत्या. भारतातर्फे दीप्ती शर्माने 19 धावांत 5 गडी बाद केले. क्रांती गौड, श्री चरणी, के. गौतम आणि शेफाली वर्मा यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.

संक्षिप्त धावफलक – भारत 20 षटकात 5 बाद 185 (रॉड्रिग्ज 43, दीप्ती शर्मा नाबाद 36, रिचा घोष नाबाद 34, हरमनप्रीत कौर 22, अनुष्का शर्मा 27, अवांतर 12, मार्क्स, रिनेकी प्रत्येकी 2 बळी, सेखुखुने 1-45), दक्षिण आफ्रिका 20 षटकात 9 बाद 171 (लूस 40, ब्रिट्स 30, वूलव्हार्ट 18, रिनेकी 21, मार्क्स नाबाद 21, अवांतर 3, दीप्ती शर्मा 5-19, क्रांती गौड, श्री चरणी, के. गौतम आणि शेफाली वर्मा प्रत्येकी 1 बळी).


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​