Uncategorized

Sangli News | सांगलीत पिटबुलचा धुमाकूळ! ७ वर्षांच्या ऋतुराजच्या चेहऱ्याचा घेतला लचका; परिसरात दहशतीचे वातावरण

                                              सांगलीत पिटबुलचा हल्ला

सांगली -शहरातील त्रिकोणी बाग परिसरात सोमवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. खेळण्यात रमलेल्या अवघ्या सात वर्षांच्या चिमुकल्यावर पिटबुल जातीच्या आक्रमक श्वानाने अचानक झडप घालत भीषण हल्ला केला. या हल्ल्यात ऋतुराज भोसले (वय ७) गंभीर जखमी झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुराज इतर मुलांसोबत खेळत असताना अचानक जवळच असलेल्या पिटबुलने त्याच्यावर हल्ला चढवला. काही क्षणांतच या श्वानाने त्याला जमिनीवर पाडत चेहऱ्यावर जबर चावा घेतला.
या हल्ल्यात ऋतुराजच्या दोन्ही डोळ्यांच्या मधोमध कपाळाजवळ तसेच डोळ्याच्या बाजूला खोल जखमा झाल्या. त्याच्या किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला. स्थानिकांनी धाडस दाखवत तत्काळ श्वानाला दा दूर लोटले, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची जखमी शक्यता होती. गंभीर अवस्थेत असलेल्या ऋतुराजला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी तत्परतेने उपचार सुरू केले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. पिटबुलसारख्या आक्रमक जातीच्या श्वानांना पाळण्यावर शासनाने निर्बंध घातलेले असतानाही शहरात असे श्वान बेकायदेशीररीत्या ठेवले जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारचीएक घटना शहरात घडली होती. दरम्यान, या घटनेची नागरी प्रशासनाने प्राथमिक नोंद घेत पोलिसांना कळवले असून संबंधित श्वानमालकावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने अशा धोकादायक श्वान पाळणाऱ्या मालकांवर तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​