Maharashtra weather | शेतकऱ्यांची चिंता वाढली! देशात यंदा पावसाची ओढ जाणवणार; हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर

देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज
पुणेः यंदाच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या मान्सूनच्या कालावधीत पाऊसमान कमीच राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तविला. यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव राहणार असल्याने देशभर सरासरीच्या ९२ टक्के पावसाची शक्यता वर्तविली आहे.भारतीय हवामान विभागाने मान्सूनबाबतचाा पहिला दीर्घकालीन अंदाज सोमवारी वर्तविला. यामध्ये पाच टक्के कमी अधिकतेची शक्यता आहे.
दरवर्षी साधारणपणे ८७ सेमी इतका पाऊस या चार महिन्यांच्याकालावधीत होत असतो. सध्या प्रशांत महासागरातील ला निनो (थंड पाण्याचे प्रवाह) कमकुवत होत असून, लवकरच तो तटस्थ स्थिती पोहोचेल, तर मान्सूनच्या कालावधीत एल निनो (गरम पाण्याचे प्रवाह) प्रशांत महासागरात विकसित होणार असून, त्याचा प्रभाव नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांवर होणार आहे.
सध्या भारतीय महासागरातीलइंडियन ओशन डायपोलची स्थिती तटस्थ स्वरुपात असून, मान्सूनच्या कालावधीदरम्यान ती पॉझिटीव्ह स्थितीत जाणार आहे. गेल्या तीन महिन्यात उत्तर गोलार्धातील बर्फाचे आवरणदेखील सरासरीपेक्षा कमी राहिले आहे. परिणामी पावसाची ओढ यंदा जाणवणारआहे. यानुसार देशात अवर्षणाच्या स्थितीची शक्यता ३५, सरासरीपेक्षा कमी ३१, सर्वसाधारण पाऊस २७, अतिरिक्त पाऊस ६, तर अतिवृष्टीची शक्यता १ टक्के इतकी वर्तविण्यात आली आहे.महाराष्ट्र तापला राज्यातील तापमान वाढीस लागले असून, बहुतांश भागातउष्णतेचा लाटेचा इशारा दिला आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे. कमाल तापमान वाढत असून, अनेक शहरे तापून निघाली आहेत. हवामान विभागाने राज्यातील बहुतांश जिल्हयांता उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट दिला आहे.
महाराष्ट्र, गोवा कर्नाटकात पाऊस कमी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडूचा बहुतांश भाग, मध्य प्रदेश, राजस्थान गुजरातचा बहुतांश भाग, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, उत्तर दक्षिण आंध्र प्रदेश, उत्तर तेलंगणा, छत्तीसगड व अंदामान बेटांचा बहुतांश भागात पावसाची तूट राहणार आहे, तर जम्मू काश्मीर, पूर्वोत्तर भारताचाा बहुतांश भाग, दक्षिण तेलंगणा, मध्य आंध्र प्रदेश येथे सरासरीपेक्षा अधिक, तर राजस्थान व गुजरातच्या काही तुरळक भागात समाधानकारक पाऊस राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
Source link



