Uncategorized

इराणमधील इंटरनेट बंदी हटणार का?

इराण आणि अमेरिका पुढील 2 आठवड्यांसाठी युद्धविरामावर सहमत झाले आहेत. परंतु याचा फायदा सर्वसामान्य इराणी जनतेला मिळणार का?, इराणमध्ये इंटरनेट सेवा पुन्हा सुरू केली जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. इराणमध्ये इंटरनेट ब्लॅकआउट 39 दिवसांपासून कायम आहे. नेटब्लॉक्सच्या डाटानुसार इराणची सामान्य जनता इंटरनेटपासून पूर्णपणे दूर असून तिला बाहेरील जगाशी जोडून घेणे अशक्य ठरले आहे.

इराणमध्ये हे आतापर्यंतचे सर्वात मोठे इंटरनेट ब्लॅकआउट ठरले आहे. इराणची जनता मागील 912 तासांपासून इंटरनेट सेवेपासून वंचित आहे. केवळ डोमेस्टिक डिजिटल सर्व्हिस आणि इंट्रानेटची सुविधा पुरविली जात आहे.

डोमेस्टिक डिजिटल सर्व्हिस अन् इंट्रानेट

डोमेस्टिक डिजिटल सर्व्हिस ही स्थानिक स्तरावर तयार करून लोकांना वापरण्यासाठी पुरविली जाते. या इंटरनेटमध्ये लोकांना लिमिटेड अॅक्सेस मिळतो, म्हणजेच सरकारकडून मंजुरी असलेले अॅप्स आणि वेबसाइट्सच लोक वापरू शकतात. याचबरोबर इंटरनेटवर सरकारचे पूर्ण नियंत्रण राहते आणि ते लोकांच्या इंटरनेट हालचालींवर नजर ठेवू शकते.

ग्लोबल इंटरनेट

इराणमध्ये ग्लोबल इंटरनेटला सामान्य लोकांसाठी कायमस्वरुपी बंद केले जाण्याचा अनुमान अनेक माध्यमांनी व्यक्त केला आहे. इराणच्या जनतेला स्थानिक स्तरावर तयार इंटरनेट चालविण्यास मिळविले, ज्यावर सरकारचे पूर्ण नियंत्रण राहण्याची शक्यता आहे.

इराण, इंटरनेट आणि सर्वसामान्य

-इराणमध्ये इंटरनेट ब्लॅकआउटचा पहिला टप्पा चालू वर्षाच्या प्रारंभी दिसून आला होता.

-इराणमध्ये निदर्शनांनंतर लोकांसाठी ग्लोबल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

-इराण-अमेरिका युद्ध सुरू झाल्यावर पुन्हा इंटरनेट बंद करण्यात आले, ज्याला 39 दिवस पूर्ण झाले.

-स्टारलिंकने इराणच्या जनतेला इंटरनेटशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे व्यापक परिणाम नाही.

-इराणमध्ये सॅटेलाइट इंटरनेटला मंजुरी न मिळाल्याने सामान्य लोक स्टारलिंकचा वापर करू शकले नाहीत.

-सर्वसामान्य अद्याप ग्लोबल इंटरनेटपासून डिस्कनेक्ट आहेत आणि ही स्थिती बदलण्याची तूर्तास शक्यता नाही.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​