Uncategorized

शहरातील विविध शाळांचा दहावी निकाल

केएलएस इंग्लिश मीडियम स्कूल

टिळकवाडी येथील केएलएस इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एसएसएलसी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. स्नेहल रेवणकर 619 गुण (99.04 टक्के), स्वस्ती राबजण्णावर 619 (98.88), आदिती गुडण्णावर 615 गुण (98.04), मेघा गोडसे 615 (98.04), सुप्रिया हुलमनी 614 (98.24), अस्मिता हुलगाबली 610 (97.06), प्रणिती संभाजी 610 (97.06), प्राची पारदी 608 (97.28), क्रिशा बस्तवाडकर 607 (97.12), वनश्री साजी 605 (96.08) गुण मिळविले आहेत.

सेंट जॉन्स इंग्लिश मीडियम स्कूल

सेंट जॉन्स इंग्लिश मीडियम स्कूलचा एसएसएलसी परीक्षेचा निकाल उल्लेखनीय लागला. श्रावणी बडिगेर 98.24 टक्के, पवन जागनुरी 93.28, अदनान शेख 92.00, सृष्टी हालण्णावर 91.00 टक्के, वैष्णवी मोळेराखी 87.68 टक्के यांनी गुण मिळविले आहेत.

न्यू गर्ल्स हायस्कूल

मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू गर्ल्स हायस्कूलचा दहावीचा निकाल 93 टक्के लागला. नम्रता माधव 83.04 टक्के, श्रेया पोटे 83.02, स्नेहा तारिहाळकर 83.01 टक्के गुण मिळविले आहे.

उषाताई गोगटे कन्या विद्यालय

बेलगाम एज्युकेशन सोसायटी संचालित उषाताई गोगटे कन्या विद्यालयाच्या मराठी माध्यमचा 100 टक्के तर कन्नड विभागाचा 98.48 टक्के निकाल लागला असून शाळेचा निकाल 98.75 टक्के लागला आहे. अनुषा कन्नाळ हिने 98.72 गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. 49 विद्यार्थिनी विशेष श्रेणीत, 77 प्रथम, 21 द्वितीय 21 तर 11 विद्यार्थिनी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत.

उदय इंग्लिश मीडियम हायस्कूल

रामतीर्थनगर येथील उदय इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल उल्लेखनीय लागला. प्रमोद जंतली 603 गुण (96.04 टक्के), समर्थ करिंदी 693 (94.07), सरोजा कत्राळ 578 (92.04) या विद्यार्थ्यांनी गुण मिळविले आहेत. शाळेचे 11 विद्यार्थी विशेष श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.

ज्ञानमंदिर स्कूल

ज्ञानमंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत यश मिळविले आहे. श्रेया पाटील 95.36, हिमांगी बसरीकट्टी 92, आराध्या सिंग 98.84, आचल माळवी 89.92 गुण मिळविले आहेत.

विज्ञान विकास मंदिर हायस्कूल 100 टक्के निकाल

मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचालित विज्ञान विकास मंदिर हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. वेदांत गिरी 87 टक्के, तरुण प्रजापत 82 टक्के, श्रीयुत पाटील 79 टक्के यांनी गुण संपादन केले आहेत. मुख्याध्यापक एस. एस. कळ्ळेकर व इतर शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.

सेंट मेरीज स्कूल

सेंट मेरीज स्कूलचा दहावी निकाल 100 टक्के लागला. 182 विद्यार्थ्यांपैकी 86 विशेष श्रेणीत, 86 प्रथम तर 10 द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. संज्योता व्हवल 99.2 टक्के प्रथम, प्रथम पाटील 98.56 टक्के, झारा मुजावर 98.56 द्वितीय तर अथर्व शेट्टी याने 97.6 टक्के, अभय पाटील, 97.6 टक्के, नुरेन मुजावर 97.6 टक्के, साक्षी तळवार हिने 97.6 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविला. समिक्षा बेळवी 97.44 टक्के, साईराज मेंडके, 97.28 टक्के, धारीत्री कौजलगी 97.12 टक्के, अपूर्वा कणगली 96.96 टक्के, ज्ञानी कदम 96.96 टक्के, प्रियांका करलिंगप्पनवर 96.96 टक्के, मानसी गेंजी 96.8 टक्के, अनिरुद्ध कामत 96.64 टक्के, भावना सुळकर 96.48 टक्के, तनुष नार्वेकर 96.48 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​