Uncategorized

“वंदे मातरम म्हणणं आमच्या आस्थेचा अपमान” बंगालमधील मुस्लिम बोर्डाचे सदस्य असं का म्हणाले?

पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर वंदे मातरमबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने राज्यातील सर्व मदरशांमधील प्रार्थना सभेदरम्यान ‘वंदे मातरम’ म्हणणे तात्काळ प्रभावाने अनिवार्य केले आहे. मात्र, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य कासिम रसूल इलियास यांनी या निर्णयावर भाष्य केले आहे. एआयएमपीएलबीचे प्रवक्ते इलियास म्हणाले की, आम्ही हे स्पष्ट केले आहे की मुस्लिम संपूर्ण ‘वंदे मातरम’ म्हणू शकत नाहीत, कारण ते आमच्या श्रद्धा आणि विश्वासाच्या विरोधात आहे.

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्याचं म्हणणं…

आयएएनएसशी बोलताना, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते कासिम रसूल इलियास यांनी स्पष्टपणे सांगितले की, मुस्लिम ‘वंदे मातरम’चे अनेक भाग म्हणू शकत नाहीत. हे त्यांच्या श्रद्धा आणि विश्वासांशी विसंगत आहे. कलम २५ हमी देते की कोणताही एक धर्म दुसऱ्यावर लादला जाऊ नये. हा एका धर्माला दुसऱ्या धर्मावर लादण्याचा प्रयत्न आहे, जो चुकीचा आणि निंदनीय आहे.

कासिम रसूल इलियास पुढे म्हणाले, “माझ्या मते हा निर्णय मागे घेतला पाहिजे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने या विषयावर निर्णय घेतला आहे. आम्ही लवकरच सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत.” पश्चिम बंगालचे मंत्री दिलीप घोष यांनी शुक्रवारी राज्यभरातील सर्व शाळा आणि मदरशांमध्ये ‘वंदे मातरम’ गाणे अनिवार्य असल्याचे सांगितल्यावर हा वाद अधिकच वाढला. एका अधिकृत आदेशानुसार, पश्चिम बंगाल सरकारने सर्व मदरशांमध्ये प्रार्थना सभेदरम्यान ‘वंदे मातरम’ गाणे तात्काळ प्रभावाने अनिवार्य केले आहे.

वंदे मातरम सर्व शाळांंमध्ये बंधनकारक

राज्य भाजप सरकारने सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीत गाणे अनिवार्य केल्यानंतर सुमारे एका आठवड्याने मदरसा शिक्षण संचालनालयाकडून हा आदेश आला आहे. सर्वत्र, सर्व शाळा आणि मदरशांमध्ये वंदे मातरम गायले जाईल. जिथे जिथे सरकारी निधी वापरला जातो आणि सरकारी कायद्यांची अंमलबजावणी होते, तिथे राष्ट्रगीत गायलेच पाहिजे . याचे पालन देशभरात केले जाते.

हुमायून कबीर काय म्हणतात.

मात्र, पश्चिम बंगाल सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यात आंदोलने सुरू झाली आहेत. ऑल बंगाल मायनॉरिटी युथ फेडरेशनचे अध्यक्ष हुमायून कबीर यांनी गुरुवारी सांगितले की, हा आदेश लागू करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला मदरसे विरोध करतील. कबीर यांनी सांगितले की, मदरशांमध्ये ‘वंदे मातरम’ गायले जाणार नाही. मदरशांमध्ये अशा बाबींवर हुकूमशाही करण्याचा सरकारला कोणताही अधिकार नाही. जर हा आदेश लागू झाला, तर सर्व मुस्लिम एकत्र येऊन या हुकूमनाम्याला विरोध करतील.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​