Uncategorized

यजमान अमेरिकेची बाद फेरीत धडक

गट ‘ड’मध्ये पटकावले अव्वल स्थान : यजमान अमेरिकेची बाद फेरीत धडक

वृत्तसंस्था

सिएटल : ख्रिश्चन पुलिसिक दुखापतीमुळे खेळू शकला नाही, तरीही अमेरिकन संघाला त्याचा कोणताही फटका बसला नाही. 48 संघांच्या या विस्तारित स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवताना अमेरिकन संघाने ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला आणि आपला स्टार फॉरवर्ड खेळाडू दुखापतग्रस्त असूनही बाद फेरीत धडक मारली. त्यानंतर पॅराग्वेने तुर्कीचा पराभव केल्यामुळे अमेरिकेने ‘गट ड’मध्ये अव्वल स्थान पटकावले.

‘गट ड’मधील अग्रक्रमांकावरील संघ म्हणून अमेरिका आता कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथे होणाऱ्या 32 संघांच्या फेरीतील सामन्यात गटात तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या संघाशी भिडेल. एसी मिलानसाठी खेळणारा आणि 87 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 33 गोल करणारा पुलिसिक पायाच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. पुलिसिकसारख्या प्रतिभावान खेळाडूशिवाय खेळणे हे अमेरिकेच्या मागील विश्वचषक संघांसाठी अडचणीचे ठरू शकले असते. परंतु 1994 मध्ये अमेरिकेने जेव्हा विश्वचषकाचे यजमानपद भूषवले होते तेव्हापासून परिस्थिती खूप बदलली आहे.

संघातील सर्वांत तऊण खेळाडू (वय 21) आणि माजी एनएफएल वाइड रिसीव्हर व सुपर बाउल विजेता आंतोनियो फ्रीमन याचा मुलगा असलेल्या अॅलेक्स फ्रीमनने 43 व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी 2-0 अशी केली. सर्जिनो डेस्टचा फटका दिशा बदलून आल्यावर फ्रीमनने त्यावर हेडर मारून आपल्या कारकिर्दीतील पहिला विश्वचषक गोल नोंदवला. व्हिडिओ पुनरावलोकनानंतर या गोलवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

त्याआधी 11 व्या मिनिटाला बालोगुनच्या जोरावर अमेरिकेने 1-0 अशी आघाडी घेतली होती. यावेळी त्याने पुलिसिकच्या जागी खेळायला आलेल्या आघाडीपटू रिकार्डो पेपीकडे एक सेंटरिंग पास दिला. चेंडू पेपीपर्यंत पोहोचलाच नाही, तो ऑस्ट्रेलियाचा बचावपटू कॅमेरॉन बर्जेसला लागून ऑस्ट्रेलियाच्या जाळ्यात गेला आणि तो एक स्वयंगोल ठरला. मध्यांतरानंतर अमेरिकन संघाने एकही गोल केला नाही, परंतु पहिल्या 45 मिनिटांत त्यांनी ज्या प्रकारे ऑस्ट्रेलियावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले, त्याने ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक टोनी पोपोविच यांच्यावर छाप पाडली.

1930 नंतर प्रथमच अमेरिकेकडून सलग सामन्यांत विजयाची नोंद

1994 मध्ये संघ सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकाच्या संघांपैकी एक म्हणून पुढच्या फेरीत गेला होता आणि 16 संघांच्या फेरीमध्ये अंतिम विजेत्या ब्राझीलकडून पराभूत झाला होता. 1930 नंतर पहिल्यांदाच अमेरिकेने विश्वचषकात सलग सामने जिंकले आहेत. अमेरिकन संघाने एकूण सहा गोल केले आहेत आणि संघातील अनेक खेळाडूंनी यात योगदान दिले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​