म्हापण ग्रामपंचायतीविरोधात गवंडेंचा उपोषणाचा इशारा

कुडाळ / प्रतिनिधी : वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण ग्रामपंचायतीच्या अनागोंदी व भ्रष्ट कारभाराची चौकशी करून संबंधीत दोषीवर कारवाई करावी या मागणी साठी म्हापणचे ग्रामस्थ व जि.प चे माजी आरोग्य व शिक्षण सभापती विकास गवंडे हे १५ ऑगस्ट रोजी म्हापण ग्रामपंचायती समोर आत्मक्लेष उपोषणकरणार आहेत तशी नोटीस म्हापण सरपंच, ग्रामसेवक यांच्या सह वेंगुर्ले तहसिलदार गटविकास अधिकारी वेंगुर्ले सह सबंधीताना नोटीस दिली आहे. आत्मक्लेश उपोषणा दरम्यान कोणत्याहीक्षणी आत्मदहन करण्याचा ईशारा श्री गवंडे यांनी दिला दिला आहे.
विकास राजाराम गवंडे यांनी म्हापण ग्रामपंचायत संरपंच ग्रामसेवक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि मी . १५ ऑगस्ट २०२६ रोजी खालील विषयासंदर्भात आत्मक्लेश आमरण उपोषण व उपोषणादरम्यान कोणत्याही क्षणी आत्मदहन करणार आहे. निवेदनात ग्रामपंचायत व गांव च्या पूढील विषयावर लक्ष वेधले आहेत.ग्रामपंचायतीने घेतलेल्या इनव्हर्टरची असलेल्या किमंतीपेक्षा भरमसाट किमंत लावलेली आहे., महिला बचतगटासाठी बांधलेल्या इमारतीला सुमारे ४०,०००/- पर्यंत खर्च पुरेसा आहे, मात्र आपण त्याची किंमत वाढवून सुमोर ३ लाखापेक्षा जास्त केलेली आहे. सदरची इमारत महसूल विभागाची असतानाही तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय ग्रामपंचायतीने वारेमाप खर्च केलेला आहे. तरी या कारणास्तव सरपंच, उपसरपंच व ज्या मासिक सभेत यासंबधीचा ठराव घेण्यात आला त्यातील सुचक अनुमोदक व उपस्थित ठरावाच्या बाजूने असलेले ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत व यासंपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी लावण्यात यावी अशी विनंती केली आहे.
मागासवर्गीयांसाठी असलेल्या निधीबाबत आपण नामांकित कंपनीचे एलईडी बल्प, ट्युबलाईट व चार्जीग बल्प ९५०/- रु. ना ग्रामपंचायतीला पोच मिळत असताना सुध्दा १६५०/-रु. ना घेऊन इतर मागासवर्गीस लोंकाची फसवणूक केलेली आहे. त्याबाबत मी ग्रामसभेत अश्या वस्तू घेऊ नये म्हणून ठराव घेतलेला असताना सुध्दा तो ग्रामसभेचा ठराव रेकॉर्डला न घेता पुन्हा सलग २ वर्षे असलेल्या किमतीपेक्षा भरमसाट किमतीला फॅन व टेबल घेतलेली आहेत त्याची मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी दखल घेऊन विभागिय चौकशी लावावी. म्हापण केंद्र शाळेमध्ये १ ली ते ५ वी पर्यंत १९ मुले व ६ वी मध्ये ६ मुले असताना सुध्दा फक्त २ च शिक्षक दिलेले आहेत तरी ६ वी साठी पदवीधर शिक्षक त्वरीत दयावा. व अशा अन्य मागण्या केल्या आहेत.
या निवेदनाच्या प्रती
मुख्यमंत्री,पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक सिंधुदूर्ग,
उपविभागिय अधिकारी सावंतवाडी, उपनिरीक्षक श्री. गायकवाड , निवती पोलिस ठाणे. प्राथमिक आरोग्यकेंद्र, परुळे. यांना दिल्या आहेत.
Source link



