महावितरणाच्या लेखी आश्वासनानंतर ‘टाळे ठोको’ आंदोलन स्थगित

आचरा, प्रतिनिधी : आचरा उपविभागातील रिक्त असलेल्या अभियंता पदांमुळे वीज ग्राहकांना होत असलेल्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने छेडण्यात आलेले ‘टाळे ठोको’ आंदोलन अखेर महावितरणने दिलेल्या लेखी आश्वासन दिल्यानंतर दोन तासांनी स्थगित करण्यात आले आहे. आचरा अंतर्गत येणाऱ्या महावितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता पद गेले 2 वर्षे रिक्त होते वरोवार मागणी करूनही महावितरण मागणीकडे दुर्लक्ष करत होते याबाबत माजी आमदार वैभव नाईक यांनी वीजवितरण कार्यालयात टाळे ठोको इशारा दिला होता. गुरुवारी सकाळी 11 वाजता आचरा विभागातील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे कार्यकर्ते मंदार ओरस्कर व बाबी जोगी यांच्या नेतृत्वाखाली आचरा वीजवितरण कार्यालयाकडे घोषणा देत दाखल होत आंदोलन चालु केले होते.
यावेळी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला शिवसैनिकांनी हार घालत निषेध नोंदवत महावितरणच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मंदार ओरसस्कर, बाबीजोगी, मंगेश टेमकर,नारायण कुबल, पूर्वा तारी, जगदीश पांगे, लवू मालंडकर, चंदन पांगे, समीर लब्दे, केदार परुळेकर, नितीन घाडी, मुन्ना परब, सचिन परब, अवी परब, राजू नार्वेकर, व अन्य कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठया संख्येने हजर होते.
Source link



