Uncategorized

फुकेरी हनुमंत गडावर वीकेंडला पोलीस पथक !

ओटवणे प्रतिनिधी : फुकेरी येथील शिवकालीनदूर्ग हनुमंत गडावर शनिवारी रविवारी पर्यटनासाठी जाणाऱ्या काही पर्यटकांकडून हुल्लडबाजी, अस्वच्छता तसेच पवित्र अशा या ठिकाणी मद्यपान करणे, गांजा सिगरेट ओढणे यासारखे प्रकार निदर्शनास आले आहेत. याबाबत फुकेरी ग्रामपंचायत आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानने दोडामार्ग पोलीस आणि दोडामार्ग तहसिलदार यांचे लक्ष वेधताच या ठिकाणी पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे.
त्यामुळे शनिवारी रविवारी यापुढे हनुमंत गडावर जाणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी करण्यात येत असून तर पर्यटकांच्या गाड्यांची पार्किंग व्यवस्था मंदिराच्या परिसरातच करण्यात आलेली आहे. पर्यायाने थेट गडाच्या पायथ्याशी गाडी घेऊन जाणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांना चपराक बसणार आहे.
फुकेरी ग्रामपंचायत आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान मागणीची तात्काळ दखल घेऊन गडावर वाढणाऱ्या पर्यटनच्या बाबतीत स्वच्छता, वाद विवाद आणि सुरक्षेच्या दृष्टीने दोडामार्ग प्रशासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे फुकेरी ग्रामपंचायत आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानने म्हटले आहे. तसेच कुटुंबासह दुर्ग भ्रमंती करणाऱ्या पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे. यापुढे गडावर असे अयोग्य प्रकार निदर्शनास आल्यास सह्याद्री प्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष सुनील राऊळ 88051 41611, किंवा फुकेरी सरपंच निलेश आईर – 94043 67752 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​