Uncategorized

पंजाब किंग्सचा स्पर्धेतील पहिला पराभव

राजस्थानचा 6 विकेट्सनी विजय :   डोनोव्हन फरेरा, यशस्वी जैस्वाल यांची अर्धशतके तर वैभवचीही तुफानी फटकेबाजी

वृत्तसंस्था मुल्लनपूर

येथील महाराजा यादवेंद्र सिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. राजस्थानने पंजाब किंग्सला घरच्या मैदानावर पराभवाचे पाणी पाजत त्यांचा विजयरथ रोखला. विशेष म्हणजे, पंजाबचा हा यंदाच्या स्पर्धेतील पहिलाच पराभव ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाबला 4 बाद 222 धावा करता आल्या. या उलट राजस्थानने 4 बाद 228 धावा करीत 6 विकेट्सने सामना जिंकला.

पंजाबने विजयासाठी दिलेल्या 223 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने दणदणीत सुरूवात केली. वैभव सूर्यवंशीने पहिल्या षटकात षटकार मारत संघाच्या वेगवान रन चेसला सुरूवात केली. त्याने पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई करताना चौकार-षटकारांची आतषबाजी केली. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना त्याला अर्शदीप सिंगने बाद करत पंजाबला यश मिळवून दिले. वैभवने 16 चेंडूत 3 चौकार व 5 षटकारांसह 43 धावांची खेळी केली. याशिवाय, आयपीएलच्या या पर्वात 400 धावा करणारा पहिल्या फलंदाजाचा मान त्याने पटकावत आँरेज कॅप ही नावावर केली.

 

जैस्वाल, फरेराची अर्धशतके

वैभव बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वालने 27 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. त्याने ध्रुव जुरेलसोबत अर्धशतकी भागीदारी साकारली. ही जोडी जमलेली असताना जुरेल 16 धावा करुन बाद झाला. पाठोपाठ जैस्वाललाही चहलने माघारी पाठवले. त्याने 27 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 51 धावांचे योगदान दिले. रियान परागला सूर गवसलेला दिसत असताना चहलने फिरकीचे जाळे टाकले अन् 16 चेंडूंत 29 धावा करणाऱ्या रियानला बाद केले. यानंतर फरेरा आणि शुभम दुबे यांनी संघ अडचणीत असताना शानदार खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला. फरेराने 26 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 52 तर दुबेने 12 चेंडूत नाबाद 31 धावांची खेळी साकारली. या जोरावर राजस्थानने 19.2 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यातच लक्ष्य पार केले. पंजाबच्या युजवेंद्र चहलने 36 धावांत 3 बळी मिळविले.

पंजाबचा पहिलाच पराभव

प्रारंभी, राजस्थानने नाणेफेक जिंकत पंजाब किंग्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. प्रभसिमरन सिंग व प्रियांश आर्य यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. प्रियांश आर्य 29 धावा करत बाद झाला. तर प्रभसिमरन सिंगने 44 चेंडूत 6 चौकार व एका षटकारासह 59 धावांची खेळी कली. तर कुपर कॉनोली व श्रेयस अय्यर दोघांनी प्रत्येकी 30-30 धावांचे योगदान दिले. तर मार्कस स्टोइनिसने अखेरच्या षटकांमध्ये वादळी फटकेबाजी केली. त्याने अवघ्या 22 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 62 धावा फटकावल्या. या जोरावरच पंजाबने 20 षटकांत 4 गडी गमावत 222 धावा केल्या. अर्थात, हे लक्ष्य राजस्थानने सहज पार केल्यामुळे पंजाबला यंदाच्या हंगामातील पहिलाच पराभव स्वीकारावा लागला.

संक्षिप्त धावफलक

पंजाब किंग्स 20 षटकांत 4 बाद 222 (प्रभसिमरन सिंग 59, प्रियांश आर्य 29, कॉनोली 30, श्रेयस अय्यर 30, स्टोइनिस नाबाद 62, यश पुंजा 2 बळी, आर्चर आणि बर्गर प्रत्येकी 1 बळी)

राजस्थान रॉयल्स 19.2 षटकांत 6 बाद 228 (यशस्वी जैस्वाल 51, वैभव सूर्यवंशी 43, ध्रुव जुरेल 16, रियान पराग 29, फरेरा नाबाद 52, दुबे नाबाद 31, चहल 3 बळी, अर्शदीप सिंग 1 बळी).

वैभव सूर्यवंशीकडे आँरेज कॅप

पंजाबविरुद्ध सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने तुफानी खेळी करताना 16 चेंडूत 43 धावा केल्या. या वादळी खेळीसह त्याने आयपीएलमध्ये चारशे धावांचा टप्पा पार केला आणि मानाची ऑरेंज कॅप आपल्याकडे घेतली. त्याने 9 सामन्यात 400 धावा फटकवल्या आहेत. वैभवपाठोपाठ हैदराबादचा अभिषेक शर्मा 380 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

 

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​