Uncategorized

पंजाब किंग्जचा पराभवाचा ‘चौकार’

दिल्ली कॅपिटल्स 3 गड्यांनी विजयी, अक्षर-मिलरची अर्धशतके, स्टार्क, तिवारीचे प्रत्येकी 2 बळी

वृत्तसंस्था, धरमशाला

कर्णधार अक्षर पटेल आणि डेव्हिड मिलर यांची दमदार अर्धशतके तसेच स्टार्क आणि तिवारी यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा 6 चेंडू बाकी ठेवून 3 गड्यांनी पराभव केला. या पराभवामुळे पंजाबचा संघ स्पर्धेच्या गुणतक्त्यात 13 गुणांसह चौथ्या स्थानावर कायम आहे. दिल्ली 10 गुणांसह सातव्या स्थानावर पोहोचले आहे. 2 बळी, एक झेल व 8 चेंडूत नाबाद 18 धावा फटकावणारा माधव तिवारी सामनावीराचा मानकरी ठरला.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजी दिली. प्रियांश आर्यच्या तुफान फटकेबाजीमुळे पंजाबने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 72 धावा झोडपल्या. प्रभसिमरन सिंगने 3 चौकारांसह 15 चेंडूत 18 धावा जमविल्या. आर्यने केवळ 33 चेंडूत 6 षटकार आणि 2 चौकारांसह 56 धावा झोडपल्या. पंजाबची ही सलामीची जोडी बाद झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि कॉनोली यांनी तिसऱ्या गड्यासाठी 83 धावांची भागिदारी केली. अय्यरने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 36 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 59 धावा झोडपल्या. कॉनोलीने 27 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 38 धावा केल्या. सूर्यांश शेडगेने केवळ 8 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 21 धावा झोडपल्याने पंजाबला 210 धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबच्या डावात 13 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. दिल्लीतर्फे स्टार्क आणि माधव तिवारी यांनी प्रत्येकी 2 तर मुकेश कुमारने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्लीच्या डावात पहिले तीन फलंदाज केवळ 33 धावांत तंबूत परतले. यश ठाकुरने दुसऱ्या षटकांतच अभिषेक पोरेलचा 5 धावांवर त्रिफळा उडविला. तर अर्शदीप सिंगने केएल राहुलला 9 धावांवर जान्सेनकरवी झेलबाद केले. अर्शदीप सिंगने दिल्लीला आणखी एक धक्का देताना साहील पारेखला चहलकरवी झेलबाद केले. चहलने हा झेल डाविकडे झेपावत टिपला. दिल्लीची स्थिती यावेळी 4.3 षटकांत 3 बाद 33 अशी होती. स्टब्ज एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचीत झाला. त्याने 1 चौकारांसह 12 धावा जमविल्या. दिल्लीने 8.2 षटकांत 4 बाद 74 धावांपर्यंत मजल मारली होती.

कर्णधार अक्षर पटेल आणि डेव्हिड मिलर यांनी संघाला विजयाची आशा निर्माण करुन दिली. अक्षर पटेलने 30 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 56 तर मिलरने 28 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 51 धावा झळकविल्या. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 64 धावांची भागिदारी केली. आशुतोष शर्माने समयोचित फटकेबाजी केली. त्याने केवळ 10 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 24 धावा फटकावल्या. तो बाद झाला त्यावेळी दिल्लीला विजयासाठी केवळ 5 धावांची जरुरी होती. शेवटी माधव तिवारी आणि अकिब नबी यांनी विजयाचे सोपस्कार 19 व्या षटकांत पूर्ण केले. अकिब नबीने विजयी षटकार खेचला. तिवारीने 8 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 18 तर नबीने 2 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 10 धावा जमविल्या. दिल्लीच्या डावात 18 अवांतर धावा मिळाल्या. दिल्लीने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 47 धावा जमविताना 3 गडी गमविले. पंजाबतर्फे अर्शदीप सिंग आणि यश ठाकुर यांनी प्रत्येकी तर ड्वारशुईस आणि स्टोइनिस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक: पंजाब किंग्ज 20 षटकांत 5 बाद 210 (प्रियांश आर्य 56, श्रेयस अय्यर नाबाद 59, कोनोली 38, प्रभसिमरन सिंग 18, सूर्यांश शेडगे नाबाद 21, अवांतर 17, मिचेल स्टार्क आणि माधव तिवारी प्रत्येकी 2 बळी, मुकेशकुमार 1-31), दिल्ली कॅपिटल्स 19 षटकांत 7 बाद 216 (अक्षर पटेल 56, डेव्हिड मिलर 51, अशुतोष शर्मा 24, माधव तिवारी, नाबाद 18, अकिब नबी नाबाद 10, साहील पारेख 13, राहुल 9, अवांतर 18, अर्शदीप सिंग व यश ठाकुर प्रत्येकी 2 बळी, ड्वारशुईस आणि स्टोइनिस प्रत्येकी 1 बळी).


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​