Uncategorized

गोळाफेकमध्ये तजिंदरपाल सिंग विजेता

वृत्तसंस्था, सांगरुर (पंजाब)

इंडियन अॅथलेटिक्स मालिकेतील येथे झालेल्या पाचव्या टप्प्यातील स्पर्धेत पंजाबच्या 31 वर्षीय तजिंदरपाल सिंग तूरने पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात 19.97 मी. ची नोंद करत विजेतेपद मिळविले. तूरची ही या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

रांची मध्ये चालू महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय अॅथलेटिक्स हंगामासाठी पंजाबच्या तूरने आतापासूनच जोरदार सरावाला प्रारंभ केला आहे. तूरने यापूर्वी दोन वेळा म्हणजे 2018 आणि 2022 साली आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. तसेच महिलांच्या भालाफेक प्रकारात अन्नु राणीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने 55.78 मी. ची नोंद केली. हरियाणाच्या शिल्पाराणीने भालाफेक प्रकारात प्रथम स्थान मिळविताना 57.65 मी. ची नोंद केली असून आंध्रप्रदेशची रश्मी दुसऱ्या स्थानावर राहिली. सांगरुरमधील झालेल्या या एकदिवशीय अॅथलेटिक्स स्पर्धेत हवाई दलाचा हरजीत सिंग आणि त्रिपुराची फातिमा बेगम वेगवान धावपटु ठरले. फातिमाने महिलांची 200 मी. धावण्याची शर्यत जिंकली. तर हरियाणाच्या किरण पहलने महिलांची 400 मी. धावण्याची शर्यत 54.07 सेकंदाचा अवधी घेत जिंकली


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​